Saturday, April 27, 2024
Homeनगरखोली दाखवण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

खोली दाखवण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वयंपाक कामासाठी खोली बघण्याच्या बहाण्याने 42 वर्षीय महिलेस खोलीवर नेऊन तिच्या इच्छेविरूध्द बळजबरीने अत्याचार केल्याची घटना अहमदनगर शहरातील उपनगरात घडली. या प्रकरणी पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विजय दशरथ शेजवळ (वय 42 तपोवन रोड, सावेडी) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

- Advertisement -

फिर्यादी स्वयंपाकाचे काम करतात. त्यांना स्वयंपाकाचे काम करण्यासाठी खोली आवश्यक होती. 27 जून रोजी विजय शेजवळ याने फिर्यादीला स्वयंपाकाचे काम करण्याकरीता खोली बघून जाण्याकरीता घेवून गेला. विजय शेजवळ याने त्यांना खोलीमध्ये नेऊन बळजबरीने तिच्या मनाविरूध्द अत्याचार केला. या प्रकरणी तोफखाना पोलिसांत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विजय शेजवळ याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी यांच्या पथकाने शेजवळ याला अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या