Thursday, April 25, 2024
Homeनगरकंट्रोलमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; एकाला अटक

कंट्रोलमुळे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; एकाला अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

टिळक रोडवरील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न बँकेच्या मुंबई कंट्रोलरूमच्या सतर्कतेमुळे फसला. कोतवाली पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले. सौरभ अशोक कोरडे (वय 27 रा. वाकोडी ता. नगर) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

बँकेचे प्रतिनिधी सचिन महानता गारवे (वय 32 रा. नवनागापूर) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी पहाटे सव्वा दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. फिर्यादी यांनी 1.55 वाजता एटीएम तपासणी केली असता ते व्यवस्थित होते. ते पुढे आयुर्वेद चौकाकडे जात असताना त्यांना 2.19 वाजता बँकेच्या मुंबई कंट्रोल रूमचा फोन आला की, तोंड बांधलेल्या व्यक्तीने सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर स्प्रे मारला असल्याची माहिती मिळाली.

त्यांनी कोतवाली पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एक व्यक्ती एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याला रंगेहाथ पकडले. त्याने त्याचे नाव सौरभ अशोक कोरडे असे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या