Tuesday, April 23, 2024
Homeनगरएटीएम क्लोन टोळीचा म्होरक्या ठाण्यातून जेरबंद

एटीएम क्लोन टोळीचा म्होरक्या ठाण्यातून जेरबंद

अहमदनगर (प्रतिनिधी)

एटीएम कार्ड क्लोन (ATM card-cloning) करून त्याद्वारे बनावट कार्ड तयार करून खात्यातून परस्पर पैसे लुटणार्‍या टोळीचा (ATM clone gang) मुख्य सूत्रधारास अहमदनगर सायबर पोलिसांनी (Ahmednagar Cyber ​​Police) वसई (ठाणे) येथून अटक केली आहे. सुजित राजेंद्र सिंंग (रा. वसई-विरार, ठाणे, मूळ रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिली.

- Advertisement -

मे महिन्यात बनावट एटीएम कार्डद्वारे (Fake ATM card) एक लाख 44 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा भिंगार पोलिसांत दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी एटीएम सेंटरमधील (ATM center) सीसीटीव्ही फुटेजवरून (CCTV footage) 2 आरोपींना अटक केली होती.

धीरज अनिल मिश्रा व सुरज अनिल मिश्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर 31 बनावट एटीएम कार्ड व 2 लाख 61 हजार 500 रुपये हस्तगत करण्यात आले होते. त्यांची कसून चौकशी केली असता गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सुजित राजेंद्र सिंग याचे नाव समोर आले. 11 सप्टेंबर रोजी अहमदनगर सायबर पोलिसांना सुजित सिंग हा वसई येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यानुसार अहमदनगरच्या सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, कर्मचारी योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, अरुण सांगळे, गणेश पाटील, वासुदेव शेलार यांच्या पथकाने वसई येथे लवलेल्या सापळ्यात सुजित सिंग सापडला.

त्याच्याकडून एक लॅपटॉप, 5 मोबाईल हँडसेट, एक संगणक, 17 पेन ड्राईव्ह, एटीएम कार्ड क्लोन करण्यासाठी वापरले जाणारे 4 स्कीमर मशीन, एक कलर प्रिंटर, 54 बनावट एटीएम कार्ड, बनावट एटीएम कार्ड करण्यासाठी लागणारे 46 कोरे कार्ड, 6 विविध कंपन्यांचे सिमकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुत्रधार सुजित राजेंद्र सिंगच्या विरोधात यापूर्वी मुंबईसह गुजरातमध्येही गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या