Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशमुलाचा एन्काउंटर, बापाची खुलेआम हत्या! ४४ वर्षात उभारलेले अतिक अहमदचे साम्राज्य ५१...

मुलाचा एन्काउंटर, बापाची खुलेआम हत्या! ४४ वर्षात उभारलेले अतिक अहमदचे साम्राज्य ५१ दिवसांत उद्धवस्त

दिल्ली | Delhi

माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रसारमाध्यमांशी बोलणाऱ्या या दोघांवर पोलिसांच्यादेखतच हल्ला झाल्याने देशभरात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

ही सर्व घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये घडली. यानंतर तिन्ही आरोपींना स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या तिन्ही आरोपींनी अतिक, अशरफ यांची हत्या का केली, यामागे त्यांचा काय हेतू होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

एखाद्या चित्रपटात शोभेल असं हत्येचं आणि त्यानंतरच्या गोळीबाराचं भयानक दृष्य कॅमेराबंद झालं आहे. अतिक आणि अशरफ यांना जेरबंद करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी जंगजंग पछाडलं होतं. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी अतिक अहमदचा मुलगा असद एन्काऊंटरमध्ये मारला गेला होता. अतिकची पत्नी शाइस्ता फरार आहे. मेव्हणा अखलाक आणि अतिक यांची दोन मुले तुरुंगात असून दोन अल्पवयीन मुले बालगृहात आहेत.

Atiq Ahmed : उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी, गँगस्टर अतिक अहमद अन् त्याच्या भावावर गोळी झाडणारे ते हल्लेखोर कोण?

माफिया अतिक अहमद, त्याचे कुटुंब आणि टोळीने प्रयागराज आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये एकापाठोपाठ एक भयंकर घटना घडवून दहशत माजवली. उमेश पाल खून प्रकरणासह, ४३ वर्षात एकट्या अतिक अहमदवर १०० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

अतीक यांने १९८९, ९१, ९३ मध्ये अपक्ष म्हणून आणि १९९६ मध्ये सपाच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक जिंकली. २००४ मध्ये सपाच्या तिकिटावर फुलपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचला. अतिकचा भाऊ अश्रफ याच्यावरही ५३ गुन्हे दाखल आहेत. २००५मध्ये अलाहाबाद पश्चिम जागेवर पोटनिवडणूक जिंकून तो विधानसभेत पोहोचला.

अतिक अहमदचा उदय

अतिक अहमदवर प्रयागराज येथे खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल १९८४ रोजी पहिला गुन्हा दाखल झाल्याची नोंद आहे. पाच वर्षांनंतर १९८९ रोजी अहमदने पहिल्यांदा तेव्हाच्या अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयदेखील मिळवला. पुढच्या दोन विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढून अहमदने ही जागा कायम ठेवली. त्यानंतर समाजवादी पार्टीने अहमदसाठी आपले दरवाजे खुले केले.

अंगात पोलिसाचा गणवेश, पायात लाल शूज; फुकटेगिरी करणारा तोतया पोलीस गजाआड

मायावतींवर गोळीबार

१९९५ मध्ये गेस्ट हाऊसकांडमुळे अहमद चर्चेत आला. युपीच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती त्यांच्या आमदारांसोबत गेस्ट हाऊसवर थांबल्या होत्या. अहमद आणि सपाच्या कार्यकर्त्यांनी या गेस्ट हाऊसला वेढा टाकून गोळीबार केला. यानंतर संतापलेल्या मायावतींनी सपासोबतची युती तोडून टाकली आणि सत्तास्थापनेसाठी भाजपाची मदत घेतली. गेस्ट हाऊसवर हल्ला झाला असताना मायावती यांना एका खोलीत बंद करण्यात आले होते. दरम्यान बसपाचे काही आमदार सपाने पकडले.

पुन्हा राजकीय भूकंप? १५ आमदार बाद होणार अन् अजित पवार भाजपसोबत जाणार…

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मतदारसंघातून खासदार

१९९६ मध्ये अतिक अहमद सपाकडून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आला. तीन वर्षांनंतर त्याने अपना दल पक्षात प्रवेश केला आणि २००२ साली पुन्हा निवडणुकीत विजय मिळवला. २००४ साली पुन्हा सपामध्ये प्रवेश करून अहमदने फुलपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. (या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व जवाहरलाल नेहरू यांनी केले होते) २००४ साली घडलेल्या एका प्रकरणामुळे अहमदचा गुन्हेगारी आणि राजकीय क्षेत्रात असलेला दबदबा उतरायला सुरुवात झाली.

अलाहाबाद पश्चिम या विधानसभेच्या मतदारसंघात अहमद लोकसभेवर गेल्यामुळे पोटनिवडणूक लागली होती. बहुजन समाज पक्षाकडून राजू पाल हे निवडणूक लढवत होते, तर सपाकडून अहमद याचा भाऊ खालिद ऊर्फ अश्रफ निवडणुकीला उभा होता. विशेष म्हणजे चमत्कारीकरित्या राजू पाल निवडून आले. त्याचा राग डोक्यात ठेवून राजू पाल यांची २००५ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यावर हत्येचा आरोप करण्यात आला.

समाजवादी पक्ष राज्यात सत्तेत असल्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. २०१९ साली दहा जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली. त्यामध्ये २०१८ साली व्यावसायिक मोहित जयस्वाल यांच्या अपहरणाचा गुन्हा देखील समाविष्ट आहे. जयस्वालने त्याची ४८ कोटी रुपयांची मालमत्ता अहमदच्या सहकाऱ्यांनी बळजबरीने त्यांच्या नावावर करून देण्यास भाग पाडल्याचा आरोप केला.

धक्कादायक! डेअरी फार्ममध्ये भीषण स्फोट; १८ हजार गायींचा होरपळून मृत्यू

अतिक अहमदचे साम्राज्य ५१ दिवसांत उद्धवस्त

२४ फेब्रुवारी : धूमगंजमध्ये उमेश पाल आणि दोन सुरक्षा जवान ठार झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अतिकचा मुलगा असद, गुड्डू मुस्लिम, गुलाम, साबीर, अरबाज, अरमान आणि विजय उर्फ ​​उस्मान चौधरी यांची ओळख पटली.

२७ फेब्रुवारी : अरबाज चकमकीत ठार, सूत्रधार वकील सदाकतला अटक

०५ मार्च: अरमान, असद, गुलाम, गुड्डू मुस्लिम आणि साबीर यांना प्रत्येकी अडीच लाखांचे बक्षीस होते, नंतर ते पाच लाख करण्यात आले.

०६ मार्च : शूटर उस्मान चौधरी चकमकीत ठार

१२ मार्च : या घटनेतील अतिकची पत्नी शाइस्ताची भूमिका समोर आली. 25 हजारांचे बक्षीस जाहीर

२८ मार्च : उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक आणि त्याच्या जवळच्या वकिलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

०५ एप्रिल : कटात अतिकचा मेहुणा अखलाक याला अटक

०८ एप्रिल: शाइस्तावर ५० हजारांचे बक्षीस, आतिकची बहीण आयेशा नूरीवरही आरोप

१३ एप्रिल: झाशीमध्ये अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम पोलिसांच्या चकमकीत ठार.

१५ एप्रिल : असद आणि गुलाम यांचे मृतदेह सकाळी ताब्यात देण्यात आले. रात्री अतिक आणि अश्रफ यांची हत्या केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या