Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाआदिवासी क्रीडा प्रबोधिनीत खेळाडू विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत : जिथीन रहमान

आदिवासी क्रीडा प्रबोधिनीत खेळाडू विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत : जिथीन रहमान

नाशिक | प्रतिनिधी

राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जून २०१५ पासून मीनाताई ठाकरे स्टेडियम हिरावाडी, पंचवटी, नाशिक येथे आदिवासी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात आली आहे. या क्रीडा प्रबोधिनीत ८ ते १२ वयोटातील खेळाडू विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांच्या सुविधा उपलब्ध आहेत.या क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश घेण्याचे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी जिथीन रहमान यांनी केले आहे.

- Advertisement -

आदिवासी क्रीडा प्रबोधिनीत ८ ते १२ वयोगटातील अनुसूचित जमातीच्या मुला/मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच जिल्हा/राज्य व राष्ट्रीयस्तरीय खेळात सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसे प्रमाणपत्र सादर करावे, क्रीडा प्रबोधिनीत उपलब्ध असलेल्या खेळ प्रकारात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल, खेळाडू विद्यार्थ्याची (Battery Test) खेळा संदर्भात चाचणी परीक्षा घेण्यात येऊन त्यानंतरच निवड करण्यात येईल.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या की डी.के. शिवकुमार? रणदीप सुरजेवाला म्हणाले…

आदिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशीत विद्यार्थ्याना दरवर्षी स्वतःच्या खेळात प्राविण्य दाखवावे लागेल. यानुसार प्रवेश घेण्यासाठी निवड पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले असून खेळाडू निवड प्रक्रिया बॅटरी ऑफ टेस्ट द्वारे घेण्यात येणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गृहपाल श्रीमती एस. एस. भोई यांना ९६८९०५६८६६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, हिरावाडी, पंचवटी, विभागीय क्रीडासंकुल मीनाताई ठाकरे स्टेडियम, नाशिक ४२२००३ येथे संपर्क साधवा, असेही प्रकल्प अधिकारी जिथीन रहमान यांनी कळविले आहे.

उद्धव ठाकरेंनी भाकरी फिरवली? कार्यकर्त्यांना दिला महत्वाचा संदेश

क्रीडा प्रबोधिनीत खेळाडू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा…

क्रीडा प्रबोधिनी परिसरात खेळाडू विद्यार्थ्यांना निवासासाठी वसतिगृहाची सुविधा

वसतिगृह प्रवेश असल्याने सर्व प्रवेशित खेळाडू विद्यार्थ्यांसाठी डीबीटी सुविधा.

शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहन व्यवस्था.

खेळ प्रकारानुसार दर्जेदार व पोषक आहार.

वैयक्तिक तसेच सांघिक खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडांगणे व उत्तम दर्जाचे प्रशिक्षक.

क्रीडाप्रकारा नुसार अद्ययावत क्रीडा साहित्य.

दर्जेदार व तज्ञ वैद्यकीय अधिकारी जसे आहारतज्ञ/मानसोपचार तज्ञ/फिजीओथेरोपिस्ट.

प्रवेशित खेळाडूंसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम.

शालेय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक तसेच सांघिक खेळांमध्ये सहभागी होण्याची संधी.

पुढील शिक्षणासाठी विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळवून कनिष्ठ/वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळवून क्रीडा क्षेत्रात करियर करण्याची संधी.

प्रशासकीय नागरी सेवेत खेळाडू कोट्यातून आरक्षण सेवेची संधी.

आदिवासी क्रीडा प्रबोधिनीतील खेळ प्रकार

खेळ प्रकार आवश्यक वयोगट विद्यार्थी संख्या

मुले मुली एकूण

कबड्डी 12 वर्ष 12 12 24

खो-खो 12 वर्ष 12 12 24

अथेलॅटिक्स12 वर्ष 5 5 10

अनो-कयाकिंग12 वर्ष 2 2 4

नेमबाजी 12 वर्ष 4 4 8

जिमनॅस्टिक्स08 वर्ष 3 3 6

कुस्ती 10 वर्ष 4 4 8

धनुर्विद्या 10 वर्ष 3 3 6

बॉक्सिंग 10 वर्ष 2 2 4

स्विमिंग 10 वर्ष 3 3 6

एकूण 50 50 100

- Advertisment -

ताज्या बातम्या