Friday, April 26, 2024
Homeनगरअटल भूजल योजनेत संगमनेर, राहाता व कर्जत तालुक्यातील 109 गावांचा समावेश

अटल भूजल योजनेत संगमनेर, राहाता व कर्जत तालुक्यातील 109 गावांचा समावेश

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

राज्यातील भूजल क्षेत्रात सुधारणा करण्याचा विचार करून भूजलाची गुणवत्ता सुधारण्यासाठी व उपलब्धता वाढविण्यासाठी

- Advertisement -

राज्यातील अतिशोषित, शोषित आणि अंशतः शोषित पाणलोट क्षेत्रातील ठराविक 13 जिल्ह्यांमधील 1339 ग्रामपंचायतींमधील 1443 गावांमध्ये केंद्र शासन व जागतिक बँक अर्थसहाय्यीत अटल भूजल योजना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या दि.14 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार राज्यातील भूजल क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने व भूजलाची गुणवत्ता व उपलब्धता सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल (अटल जल) योजना राज्यात ठराविक 13 जिल्ह्यांमधील 73 पाणलोट क्षेत्रातील 1339 ग्रामपंचायतींमधील 1443 गावांमध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अटल भूजल योजनेमध्ये केंद्र शासन व जागतिक बँक यांचा वाटा 50:50 असा आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्याला प्राप्त होणारा अधिकतम निधी एकूण रु.925.77 कोटी इतका असून, राज्यास प्राप्त होणारा संपूर्ण निधी हा अनुदान व प्रोत्साहन स्वरूपात प्राप्त होणार आहे. अटल भूजल योजना राज्यात 13 जिल्ह्यांमध्ये सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे.

योजना कार्यक्षेत्र- राज्यातील सन 2013 च्या भूजल अंदाज अहवालानुसार अति-शोषित(74) , शोषित(04) आणि अंशत: शोषित(111) असलेल्या एकूण 189 पाणलोट क्षेत्रांपैकी 13 जिल्ह्यांतील 38 तालुक्यांतील 73 पाणलोट क्षेत्रातील 1339 ग्रामपंचायतीमधील 1443 गावांची निवड करण्यात आली आहे.

प्रकल्प अंमलबजावणी व संनियंत्रण यंत्रणा..

जिल्हा पातळीवर प्रकल्प अंमलबजावणी व संनियंत्रण शक्य होण्याकरिता संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर अटल भुजल योजना समिती गठीत करण्यात येत आहे

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शिखर समिती गठीत करण्यात आली.

जिल्हास्तरीय अटल भूजल योजना समिती… पालकमंत्री -अध्यक्ष, सदस्य- संबंधित तालुक्यातील विधानसभा सदस्य, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण स्थानिक स्तर, जिल्हा जलसंधारण अधिकारी , जिल्हा परिषद (ल.पा.), जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (सदस्य सचिव), निमंत्रित सदस्य-2 (आवश्यकतेनुसार अध्यक्षांच्या परवानगीने).

योजनेत समाविष्ट नगर जिल्ह्यातील गावे…

कर्जत (24 गावे) – अखोणी, येसवाडी, बेनवाडी, कोळवाडी, भांडेवाडी, चिलवडी, होळेवाडी, देशमुखवाडी, दुरगाव, काळ्याची वाडी, कानगुडवाडी, कारभानवाडी, कारपडी, नेटकेवाडी, नंदगाव, परीटवाडी, पिंपळवाडी, राशीन, रेहकुरी, सोनलवाडी, थेरवाडी, तोरकडवाडी, वडगाव तनपुरे, वायसेवाडी.

राहाता (9गावे)-भगवतीपूर, चंद्रपूर, गोगलगाव, हनुमंतगाव, हसनापूर, लोहगाव, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, पाथरे बुद्रुक.

संगमनेर (76गावे)-अंभोरे, अश्वी बुद्रुक, अश्वी खुर्द, औरंगपूर, चंदनापूरी, गभानवाडी, चिकणी, चिंचपूर खुर्द, चिंचपूर बुद्रुक, दाढ बुद्रुक, देवगाव, दाढ खुर्द, डिग्रस, दुर्गापूर, घुलेवाडी, गुंजाळवाडी, हंगेवाडी, हिवरगाव पावसा, जाखोरी, जोरवे, कणकापूर, कानोली, गुंजाळवाडी, करजुले पठार, कारुळे, कासारदुमला, खळी, खांडगाव, खांजापूर, खर्डी,कोकणगाव, शिवापूर, कोल्हेवाडी, कोलवाडे, कोंची, मांची, कुरण, मलदाड, मालेगाव हवेली,मालुंजे, मंगलापूर, मानोली, निलवंडे, निंभाळे, निमगाव भोजापूर, निमगाव जाली, निमगाव टेंभी, ओझर बुद्रुक, ओझर खुर्द, पानोडी, पिंपळगाव ढेपा, पिंपरणे, पिंपरीलौकी, पोखरी बाळेश्वर,पोखरी हवेली, प्रतापूर, रहीमपूर, राजापूर,रायते, रायतेवाडी, सादतपूर, समनापूर, संगमनेर खुर्द, वैदूवाडी, सावरगाव ताल, सायखिंडी, शेडगाव, शिबलापूर, सोनोशी, सुकेवाडी, बाळापूर, उंबरी, वडगावपान, वाघापूर, वेल्हाळे, झोल.

राज्यातील 1443 गावांत होणारी कामे..

भूजलासंबंधित माहिती व अहवाल जनसामान्यांकरिता खुले करणे

2) लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडे तयार करणे

3) भूजल पुनर्भरण उपाययोजना:–

रिचार्ज ट्रेंच व रिचार्ज शाफ्ट, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध व दगडी बांध, विहिर पुनर्भरण, इत्यादी कामे.

4) सिमेंटनाला बांध व तत्सम कामे हायब्रीड गॅबियन अस्तित्वातील जलसंधारण कामांची दुरूस्ती भूजल पुनर्भरण, शाफ्ट सिस्टीम पुनर्भरण, शाफ्ट दुरुस्ती अस्तित्वातील जलसंधारण कामाच्या साठवण क्षेत्रातील गाळ काढणे.

5) मागणी व्यवस्थापन व पाणी बचतीच्या उपाययोजना

6) प्रस्तावित पाणी बचतीच्या योजना:–ठिबक सिंचन संच बसविणे, स्प्रिंक्लर सिंचन संच बसविणे, मल्चिंग आच्छादने,मूरघास इ .

7) भूजल पातळीतील घसरण दरामध्ये सुधारणा करणे.

- Advertisment -

ताज्या बातम्या