Thursday, April 25, 2024
Homeनगरनुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करू - ना. तनपुरे

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करू – ना. तनपुरे

उंबरे |वार्ताहर| Umbare

वादळी पावसामुळे वांबोरी येथील नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेतकर्‍यांना दिली.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे वादळी वार्‍यासह पावसाने अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले. काहींचे पत्रे उडाली तर या अपघातामध्ये एक गाय दगावली. या सर्व घटनेची पाहणी करताना ना. तनपुरे म्हणाले, वादळी वार्‍यामुळे या परिसरामध्ये पंचवीस ते तीस पुलांचे नुकसान झाले आहे. ट्रान्सफार्मर यामुळे बंद असून या सर्व घटनेची माहिती घेऊन त्यांना तातडीचे आदेश दिले आहेत.

यावेळी नागरिक आणि शेतकर्‍यांनी समस्या मांडल्या. त्या तात्काळ सोडविण्यासाठी मीही पुढाकार घेतला. गडाख वस्तीसाठी स्मशानभूमीसाठी दहा लाख रुपये देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. वाड्या वस्त्यांवरील रस्ते पूर्ण करून देणार असल्याचे सांगितले. ज्या महिलांनी साईड गटार करून देण्याची मागणी केली, तीही लवकरच पूर्ण करणार असून नगर-वांबोरी या रस्त्याच्या घाटामध्ये काम अपूर्ण राहिले असून या कामाची पाहणी करून फॉरेस्ट अधिकार्‍यांना बोलावून कामाचा सोक्षमोक्ष लावणार आहे.

नुकसानग्रस्त शेतकरी भास्कर गडाख यांच्या वस्तीवर गाईच्या अंगावर शेड पडल्यामुळे सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचे नुुकसान झाले. तुळशीराम पागिरे, सयाजी पागिरे, रामभाऊ बोरकर, कैलास बोरकर यांच्या वस्तीवर असणार्‍या शेडचे पत्रे उडाले व ते शेड कोसळले. रावसाहेब गडाख यांच्या संत्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची सर्व पाहणी ना. तनपुरे यांनी केली. या सर्व नुकसानीचे पंचनामे राहुरी तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले.

यावेळी राहुरीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, महावितरणचे धीरज गायकवाड, मंडल अधिकारी दत्तात्रय गोसावी, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब गागरे, कामगार तलाठी अभिजीत क्षीरसागर, तुषार मोरे, ईश्वर कुसमुडे, बाबुराव तोडमल, संभाजी गडाख, बापूसाहेब गडाख, पोपट देवकर, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक भारत तारडे, राहुरी बाजार समितीचे संचालक रंगनाथ मोकाटे, विठ्ठल मोकाटे, शब्बीर शेख, ज्ञानेश्वर खुळे, बाळासाहेब खुळे, अशोक पटारे, विलास शिरसाट, कारभारी गांधले, गोरख ढवळे, भाऊसाहेब पटारे, चंद्रकांत पटारे, काशिनाथ बोरकर, दिलीप गडाख, शिवाजी पटारे, शिरपा गडाख, भाऊसाहेब गडाख, अनिल गडाख, किशोर गडाख, लाला गडाख आदी शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या