Monday, April 29, 2024
Homeनगरदररोज पाच मालमत्ता जप्तीचे आयुक्तांचे आदेश

दररोज पाच मालमत्ता जप्तीचे आयुक्तांचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वसुलीला प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सर्व प्रभाग अधिकार्‍यांना दररोज पाच जप्ती कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. मालमत्ता कराच्या थकबाकीपोटी सावेडी प्रभाग कार्यालयाने जॉगिंग ट्रॅक जवळील कोहिनूर अपार्टमेंटमधील सुरेश जयराम तलरेजा यांच्या मालकीचे दोन गाळे सील केले आहेत. आयुक्त डॉ. जावळे यांच्या आदेशानुसार जप्ती कारवाई सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

तलरेजा यांच्याकडे मालमत्ता कराची एक लाख 52 हजार 666 व 89 हजार 571 रूपये थकबाकी आहे. प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, सहाय्यक लेखा अधिकारी तथा नियंत्रण अधिकारी एच. आर. सय्यद, कर निरीक्षक संजय उमाप, वसुली कर्मचारी पथक प्रमुख बाळासाहेब पवार, अशोक कन्हेरकर, सूर्यभान देवघडे, नारायण बेरड, संजय तायडे, संदीप कोलते, अजय कांबळे, रवींद्र सोनवणे, पाशा शेख, रफिक देशमुख यांनी सदर मालमत्ता सील केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या