Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याविधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा

विधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा

मुंबई | Mumbai

राज्याच्या राजकारणात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात अखेर गुरुवारी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाचं पालन करत देवेंद्र फडणवीसही मंत्रिमंडळात सहभागी झाले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

- Advertisement -

दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. हे अधिवेशन ३ आणि ४ जुलैला होणार आहे. सुरुवातील २ आणि ३ जुलैला अधिवेशन बोलावलं होतं. मात्र, आता हे अधिवेशन ३ आणि ४ जुलैला बोलावण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभापती निवडी पूर्ण होणार ( Assembly speaker selection ) आहेत. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून सभापतीपद रिक्त राहिलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या