Friday, April 26, 2024
Homeनाशिकविधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ होम क्वारंटाइन

विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ होम क्वारंटाइन

ओझे | Oze

महाराष्ट राज्य विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या मुंबई कार्यालयातील एक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आल्याने ते कार्यालय बंद करण्यात आले आहे.

- Advertisement -

ना. नरहरी झिरवाळ यांनी जनतेला आव्हाहन केले आहे की, मी स्वतः आठ दिवस होम क्वारंटाइन राहणार असून माझे कार्यालय व कामकाज सुरूच राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व कोणतीही अडचण असल्यास माझे स्वीय सहाय्यकांशी संपर्क साधावा.

तसेच सर्व जनतेला आव्हाहन करण्यात येते की करोनाच्या या कालावधीत आपण आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. कुठेही काम नसल्यास विनाकारण गर्दी करू नये. कामापूरते बाहेर पडल्यास मास्क लावावे व सामाजिक अंतर ठेवूनच कामकाज करावे.

स्वताने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली तरी आपले गावं, तालुका, जिल्हा व राज्य करोनामुक्त होईल आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेलाही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या