Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशइराणच्या अणूसंशोधकाची दहशतवाद्यांनी केली हत्या

इराणच्या अणूसंशोधकाची दहशतवाद्यांनी केली हत्या

मुंबई l Mumbai

इराणला आण्वस्त्रसज्ज बनवण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणारे वरीष्ठ अणू संशोधक आणि अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचरांच्या दीर्घकाळ रडारवर असणारे मोहसीन फक्रिझादेह (Mohsen Fakhrizadeh) यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. इराणमध्ये या बातमीमुळे खळबळ माजली आहे.

- Advertisement -

या हल्ल्यामागे इस्त्रायलचा हात असल्याचे पुरावे सापडल्याने इराणकडून हा आरोप करण्यात येत आहे. इस्त्रायलने यावर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जवाद जरीफ म्हणाले की, दहशतवाद्यांनी एका ज्येष्ठ इराणी वैज्ञानिकाची हत्या केली. या हत्येवरून असे दिसून येते की, इस्त्रायल युद्धासाठी उतावीळ आहे. इस्त्रायलच्या बेजामिन नेतन्याहू यांनी एका कार्यक्रमात फखरीजादेह यांचे नाव घेतले होते. फखरीजादेह हे प्रवास करत असताना तेहरानजवळ हल्लेखोरांकडून त्यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला. फखरीजादेह हे 2003 पासून इराणच्या गुप्त अणुबॉम्ब निर्मिती मोहिमेचे नेतृत्व करत होते. मात्र, इराणकडून आण्विक हत्यारे बनविण्याच्या आरोपांचे नेहमी खंडण करण्यात येत होते. इराणचे मिलिट्री कमांडर हिसैन देहघन यांनी ट्विट करून या हत्येचा मोठा बदला घेतला जाईल. या हल्ल्यात ज्यांचा कोणाचा हात आहे ते लोक पश्चावणार आहेत, अशी धमकीसुद्धा देण्यात आली आहे. वैज्ञानिकावरील हत्येची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून घेण्यात आलेली नाही. इस्त्रायलकडूनसुद्धा यावर बोलण्यास नकार देण्यात आला आहे. फखरीजादेह यांना द फादर ऑफ इरानियन बॉम्ब असे म्हटले जाते.

मोहसीन फखरीजादेह यांच्या हत्येमुळे इराण आणि इस्रायल यांच्यातला तणाव वाढला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. पाश्चात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणांचा असा विश्वास आहे की इराणच्या गुप्त अण्वस्त्र शस्त्रांच्या मोहिमेबाबत कायमच मोहसीन फखरीजादेह होते. परराष्ट्र मुत्सदी मोहसीन फखरीजादेह यांना इराणी अणुबॉम्बचे जनकही मानतात. आपला आण्विक कार्यक्रम शांततापूर्ण हेतूंसाठी असल्याचं इराणने कायमच सांगितलं आहे. २०१० ते २०१२ या दोन वर्षांच्या कालावधीत इराणच्या चार अणुशास्त्रज्ञांची हत्या झाली. यासाठी इराणने इस्रायलला दोषी ठरवलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या