Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारनवापूर येथून अष्टविनायक दर्शन बस रवाना

नवापूर येथून अष्टविनायक दर्शन बस रवाना

नवापूर ।Navapur । श.प्र.

येथील एस.टी.आगारातून (ST Agar) अष्टविनायक दर्शन (Ashtavinayak Darshan bus) सेवायात्रेची पहिली बस रवाना (departs) करण्यात आली आहे. नवापूर आगारातर्फे अभिनव उपक्रम (Innovative activities) सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

माफक दरात शिर्डी व अष्टविनायक दर्शन सह शनिशिंगणापूर श्री क्षेत्र देवगड दत्तमंदिर येथे भाविकांना दर्शनार्थ बस सेवेचा प्रारंभ नवापूर येथील सेवा निवृत्त आदर्श शिक्षक शिक्षक विक्रम गोपाळ पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला आहे. यात्रेदरम्यान देव दर्शनासह पर्यटन स्थळांना भेट देणार असल्याची आगारप्रमुखांनी माहिती दिली.

नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सदर यात्रा दि.11 ते 13 सप्टेंबर अशी तीन दिवसांची अशी राहणार आहे. आगाराच्या या उपक्रमाबद्दल सर्वस्तरातून कौतूक व समाधान व्यक्त होत आहे.

पुढील आठवड्यांसाठी आपल्या परिवारातील सदस्यांसाठी आताच बुकींग करून जास्तीत जास्त या संधीचा लाभ करून घ्यावा असे आवाहन आगार प्रमुख राजेंद्र आहिरे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या