Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजन'आश्रम चॅप्टर-२' वादाच्या भोवऱ्यात

‘आश्रम चॅप्टर-२’ वादाच्या भोवऱ्यात

दिल्ली l Delhi

‘आश्रम-२’ या वेब सीरीजमध्ये सनातन धर्माशी संबंधित धार्मिक भावना दुखावणारे दृश्य चित्रित केल्याचा आरोप करत दिवाणी कोर्टाच्या वकिलाने गुरुवारी जौनपूर न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी अभिनेता बॉबी देओल आणि निर्माते प्रकाश झा यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात खटलाही दाखल केला आहे.

- Advertisement -

जौनपूर दिवाणी कोर्टाचे वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) अधिवक्ता उपेंद्र विक्रम सिंह यांच्यामार्फत न्यायालयात हा अर्ज दाखल केला आहे. या अर्जात हिमांशू यांनी म्हटले की, ‘सनातन धर्मावर माझा खूप विश्वास आहे. लहानपणापासूनच आम्हाला आश्रम आणि पवित्र हिंदू ग्रंथ माहित आहे आणि आम्ही त्याबद्दल खूप ऐकले आहेत. आश्रम हे ऋषीमुनींचे पवित्र स्थान असल्याचे म्हटले जाते. सुसंघटित आश्रम संस्था हे भारतातील वैशिष्ट्य आहे. ‘आश्रम चॅप्टर-2’मध्ये निर्दोष लोकांना आश्रमावरील श्रद्धेच्या नावाखाली कसे गुंडाळले जाते, गुन्हेगारी आणि राजकारणाची युती कशी आहे, आश्रमांमध्ये व्यभिचार आणि मादक पदार्थांचा व्यापार इत्यादी कसे चालतात, हे दाखवले गेले आहे, जे चुकीचे आहे.’

नुकतेच आश्रम भाग दोन प्रदर्शित झाला दरम्यान धार्मिक भावना दुखावल्याचे म्हणत, करणी सेनेने प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. करणी सेनेच्या राज्य संघटनेचे सरचिटणीस सुरजित सिंह यांनी प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. प्रकाश झा व्यतिरिक्त, जिथे ही वेब सीरीज प्रदर्शित करण्यात आली त्या ‘एमएक्स प्लेयर’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला देखील कायदेशीर नोटीस पाठवली गेली आहे. ‘या वेब सीरीजमधून धार्मिक परंपरा, आश्रम धर्म, प्राचीन सांस्कृतिक परंपरा यांना लक्ष्य करण्यात आले आहे’, असे करणी सेनेने आपल्या या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या