Saturday, April 27, 2024
Homeनगरअशोकच्या साखर उत्पादनाची चौकशी करा

अशोकच्या साखर उत्पादनाची चौकशी करा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या साखर उत्पादन खर्चाची चौकशी करावी, अशी मागणी तालुक्यातील

- Advertisement -

निवृत्ती विठ्ठल पवार, जी. के. पाटील व चांगदेव यादवराव पवार यांनी राज्याचे सहकार मंत्री, प्रादेशिक सह संचालक साखर यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, अशोक कारखान्याचे गळीत हंगाम 2013-14 ते 2017-18 चे उत्पादन खर्चाच्या चौकशीसाठी 28 फेब्रुवारी 2019 मुख्य सचिव तथापी उस दर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व साखर आयुक्त यांच्याकडे निवेदन दिलेले होते. त्या अनुषंगाने प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने प्रथम विशेष लेखा परीक्षक (साखर) वर्ग-1 यांची चौकशीसाठी अहवाल सादर करण्यासाठी नियुक्ती केलेली आहे.

या कामी चौकशी होऊन अर्जदार यांना माहिती देणेसाठी याच कार्यालयाकडे दि. 17 जुलै 2019, दि.18 नोव्हेंबर 2019, व दिनांक 24 जानेवारी 2020 ला स्मरणपत्र देखील दिलेले आहेत. तथापी अठरा(18) महिन्याच्या कालावधी होऊनही चौकशीची माहिती न मिळाल्याने कार्यालयात समक्ष चौकशी केली असता कारखाना माहिती देत नसल्याने चौकशी अहवाल अद्याप अप्राप्त असल्याचे सांगण्यात आले.

अशोकच्या उत्पादनखर्चाची चौकशी केल्यास कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार उघड होणार आहे त्यामुळे सहकारातील अधिकारी कारखान्याला पाठीशी घालण्यासाठी हे प्रकरण गेल्या 18(अठरा)महिन्यापासून प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे असा आमचा संशय आहे.

तरी अशोक कारखान्याच्या साखर उत्पादन खर्चाची चौकशी लवकरात लवकर प्राप्त व्हावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर निवृत्ती विठ्ठल पवार, जी. के. पाटील, चांगदेव यादवराव पवार यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या