Wednesday, May 8, 2024
Homeनगर‘अशोक’च्या कार्यक्षेत्रात नोंद नसलेल्या अतिरीक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्याची बोलणी यशस्वी

‘अशोक’च्या कार्यक्षेत्रात नोंद नसलेल्या अतिरीक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्याची बोलणी यशस्वी

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात लागवडीची नोंद नसलेल्या सभासदांच्या व बिगर सभासदांच्या ऊस तोडणीचा प्रश्न गंभीर झाला आहे. कार्यक्षेत्रातील उसापेक्षा बाहेरचा ऊस गाळपासाठी आणला जात आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या धोरणाचा आर्थिक फटका थेट कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बसत असल्याने नोंदी नसलेल्या शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने शेतकरी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष अ‍ॅड. आजित काळे याची भेट घेवुन व्यथा मांडल्याने काळे यांनी साईकृपा कारखान्याच्या संचालकांशी चर्चा करुन तोडगा काढल्याने अशोकने आतिरीक्त ठरवलेल्या ऊसाचा प्रश्न निकाली निघणार असल्याची माहीती विष्णुपंत खंडागळे यांनी दिली.

- Advertisement -

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात खंडागळे यांनी म्हटले आहे, अशोकच्या व्यवस्थापनाने बाहेरच्या ऊसवर नेहमीच डोळा ठेवुन कार्यक्षेत्रातील ऊसाच्या खोडक्या गेल्या पाच सहा वर्षात केल्या आहे. तोडणी कार्यक्रम बाहेरच्या ऊसतोडीसाठी राबवला जात असल्याने कार्यक्षेत्रातील ऊस गाळपास उशिर होवुन शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

शेतकर्‍यांना बसणारा आर्थिक फटका टाळण्यासाठी शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांची औरंगाबाद येथे भेट घेवुन ऊस उत्पादक शेतकर्‍यांची व्यथा मांडली. अ‍ॅड. काळे यांनी तातडीने साईकृपा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र ढमढेरे यांच्याशी संपर्क करुन शेतकर्‍यांसह बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक तोडगा काढुन येत्या दोन-तीन दिवसात ऊसतोडणी मजुर ऊसतोडीसाठी दाखल होणार आहेत. शासनाच्या धोरणानुसार वेळेत पेमेंट करण्यात येणार आहे. खाजगी काट्यावर वजन केले तरी अडचण केली जाणार नाही. असेही या बैठकीत ठरल्याने अशोककडे नोंदी नसलेल्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा तोडणीचा प्रश्न निकाली निघाला असल्याने शेतकर्‍यांना संभाव्य आर्थिक फटका बसणार नाही, असेही खंडागळे म्हटले आहे.

या शिष्टमंडळात विष्णुपंत खंडागळे,अ‍ॅड. सर्जेराव कापसे, अ‍ॅड. सर्जेराव घोडे, मधुकर कोकणे, रमेश उंडे, बाळासाहेब दौंड, गोविंदराव वाघ, देवदास कोकणे, सकाहरी शेजुळ, किशोर शिंदे, प्रकाश पटारे, राजेंद्र माने आदी सहभागी होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या