Friday, April 26, 2024
Homeनगर‘अशोक’ च्या निवडणूक प्रचारात कौंटुंबिक वाद चव्हाट्यावर

‘अशोक’ च्या निवडणूक प्रचारात कौंटुंबिक वाद चव्हाट्यावर

मुलाने बापाची तर सुनेने सासर्‍याची सेवा करणे हिच आपली संस्कृती – मुरकुटे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

मुरकुटे आडनाव लाभले म्हणून लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करु नये. मुलाने बापाची तर सुनेने सासर्‍याची सेवा करणे ही आपली कौटुंबिक संस्कृती आहे, हे ध्यानात ठेवावे, अशी टिप्पणी माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी ज्ञानेश्वर मुरकुटे व डॉ. सौ. वंदना मुरकुटे यांचे नाव न घेता केली.

श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे अशोक सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचार सभेप्रसंगी श्री. मुरकुटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कचरू बढे होते. लोकनियुक्त सरपंच आबासाहेब गवारे यांचे मार्गदर्शनाखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उमेदवार कोंडीराम उंडे, सोपानराव राऊत, रामभाऊ कसार, ज्ञानेश्वर काळे, शितलताई गवारे, श्री. मुरकुटे म्हणाले की, कारखाना संलग्न शिक्षण संस्थाबाबत खोटानाटा प्रचार करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शिक्षण संस्थांच्या विश्वस्त मंडळात नाही. या संस्था सभासदांच्या मालकीच्या असून कारखान्याचे संचालक हेच शिक्षण संस्थांचे विश्वस्त आहेत. याची रितसर व कायदेशीर नोंद धर्मदाय आयुक्त कार्यालयात आहे. केवळ गैरसमज पसरविण्याच्या हेतूने काही मंडळी अपप्रचार करत आहेत त्यांना सभासदांनी धडा शिकवावा.

याप्रसंगी कचरू पाटील बढे, गोरक्षनाथ गवारे, शंकर गवारे, रामदास ताके, प्रवीण गवारे, दत्तात्रय गवारे, प्रकाशराव गवारे, धनाड पाटील, सुभाष गवारे, बाळासाहेब बकाल, ललित गायकवाड, सुदर्शन निकाळे, बाळासाहेब गवारे, दत्तात्रेय बकाल, लहानू गवारे, दत्तात्रेय जाधव, भाऊसाहेब जाधव, जगदीश गवारे, मनोज गवारे, शिवाजी गवारे, सरुनाथ कसार, राजेंद्र यादव, राजेंद्र ताके, भाऊसाहेब यादव, शांताराम गवारे, शांतवन गायकवाड, सुरेश डाके, अशोक गवारे, भागवत गवारे, गोकुळ गवारे, अरूण गवारे, बाळासाहेब कसार, बाबासाहेब पवार, सर्जेराव पवार, बाप्पूसाहेब गायकवाड, बापूसाहेब पवार, प्रदीप कसार, संपत कसार, अनिल पवार आदींसह सभासद मोठ्या संख्यने उपस्थित होते.

‘त्यांनी’ कौटुंबिक नव्हे तर कारखाना प्रश्नावर निवडणूक लढवावी – ज्ञानेश्वर मुरकुटे

माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav

निवडणूक ही अशोक साखर कारखान्यांची असून कारखान्याचे प्रश्नावर बोला, ऊसाला चांगला भाव देऊ, उसाच्या खोडक्या होऊ देणार नाही, लागवडीसाठी बिनव्याजी कर्ज देऊ, कामगारांचे पगार वेळेवर करू, यावर बोलयाचे सोडून ‘त्यांनी’ कौटुंबिक वादात माझ्यावर गलिच्छ भाषेत बोलू नये. चुलते भास्करराव मुरकुटे यांच्या मध्यस्थीने कौटुंबिक वाद वेळीच मिटवला असता तर आज ही वेळ आली नसती, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर भानुदास मुरकुटे यांनी केले.

अशोक सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ शेतकरी संघटना पॅनलची खानापूर, भामाठाणनंतर माळवाडगाव येथे ज्येष्ठ सभासद आण्णासाहेब देवराव आसने यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली, यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे नाव न घेता ही विनंती केली.

अ‍ॅड. अजित काळे म्हणाले, आम्ही सर्वांनी एका विचाराने प्रेरित होऊन सहा महिन्यांपासून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करत होतो. अनंत अडचणींना सामोरे जाऊन सुदैवाने बदल हा नियतीलाही मान्य असावा आमच्या प्रयत्नांस यश आले.

कृषक समाजच्या प्रमुख अनुराधा आदिक म्हणाल्या की, शेतकरी संघटनेचे नेते अशोक कारखाना निवडणुकीचा जाहीरनामा घेऊन आमच्याकडे आले. ऊस उत्पादक सभासद, कामगार यांच्या हिताचा जाहीरनामा पाहून मी व अविनाश आदिक यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

शरद आसने यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शेतकरी संघटनेचे सुरेश ताके, यांचीही भाषणे झाली

यावेळी अर्चना पानसरे, अनिल औताडे, जितेंद्र भोसले, निलेश आदिक, शिवाजी शेजुळ दिलीप पवार या उमेदवारांसह अ‍ॅड. सर्जेराव कापसे,अ‍ॅड सर्जेराव घोडे, अ‍ॅड. दिलीप मुठे, गणपतराव आसने, सुदामराव आसने, विजय आसने, पाराजी दळे, उत्तमराव आसने, जालींदर आसने, दत्तात्रय दळे, रावसाहेब आसने, रंगनाथ कापसे, यशवंत हुरूळे, आण्णासाहेब आसने, श्रीकांत दळे, विठ्ठलराव आसने आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या