Thursday, April 25, 2024
Homeनगरअशोक कारखाना चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाची शुक्रवारी निवड

अशोक कारखाना चेअरमन, व्हाईस चेअरमनपदाची शुक्रवारी निवड

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड शुक्रवार दि. 28 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजता करण्यात यावी , अशा आशयाचे पत्र सहाय्य उपनिबंधक व अशोक कारखाना निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांनी अशोक कारखान्याच्या कार्यकारी संचालक यांना दिले आहे.

- Advertisement -

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांची बैठक आयोजित करावी, अशी सूचना गणेश पुरी यांनी दिली आहे. सदरची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड ही निवडून आलेल्या संचालकांमधून केली जाणार आहे. प्रक्रियाअंतर्गत निवडून आलेल्या सदस्यांची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

त्याअन्वये नवनिर्वाचित सदस्यांमधून पदाधिकारी निवड करणेसाठी शुक्रवार, दि.28 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2.00 वा. सभा आयोजित करावी. याकामी निवडून आलेल्या संचालकांना अजेंडा बजावून त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. तसेच सभेसाठी योग्य ती कार्यवाही करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या