गॅस लिकमुळे कपाशी विक्रीचे साडेसात लाख रुपयांची राख

jalgaon-digital
2 Min Read

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील पोहोरे येते एका शेतकऱ्याच्या घरात (farmer’s house) गॅस सिलेंडर (Gas cylinder) लिक (leak) मुळे लागलेल्या आगीत (fire) कापूस विकून ठेवलेले ७ लाख ७० हजार रुपये रोख व संसारोपयोगी साहित्य असे एकूण 20 लाख रुपयांचे नुकसान (Damage) झाले आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला (Police station) अकस्मात आगेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान शेतकऱ्याचे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की केशव राघव महाजन (Keshav Raghav Mahajan) यांची पत्नी घरी गॅस वर दाळ शीजवत असताना, गॅस सिलेंडचे रेगुलेटर लिंक (Regulator link) होऊन आग लागली. यात केशव राघो महाजन यांनी दोन दिवसापूर्वीच कापूस विकून (Selling cotton) पत्र्याच्या कोटी मध्ये ठेवलेले ७ लाख ७0 हजार रुपये अल्युमिनियमच्या डब्यांमध्ये ठेवले सोन्याचे दागिने आगी आगीमध्ये (fire) जळून खाक झाले. तसेच संसार उपयोगी वस्तू कपडे ,भांडे तसेच घरावरील छप्पर म्हणजे लाकडाचा विमला संपूर्ण जळून खाक झाले.

आगीने रौद्ररूप घेतल्याने केशव महाजन यांच्या घराजवळ असलेले निंबा काळू महाराज , मधुकर दगा माळी यांच्या घराला आग लागून नुकसान झाले. आग आटोक्यात येत नसल्याने या बाबतची माहिती केशव महाजन व पोहरे सरपंच यांनी पोलीस स्टेशनला (Police station) दिली, पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी अग्निशामक दलाची (fire brigade) गाडी बोलूनव गावकऱ्यांनी आग विझविली आहे .

एवढ्या कष्टाने मेहनतीने कापूस पिकवला दोन पैसे जास्त मिळतील या आशेने दोन दिवसापूर्वी कापूस विकला (Selling cotton) आणि नियतीने असा घाला घातला केशवराव महाजन यांच्या मालकीचे स्वतःचे घर नसून ते आधार दगा माळी यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत आहेत. या आगीत कमीत कमी वीस लाख रुपये इतकं नुकसान (Damage) झालेले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

घटनेचे गांभीर्य ओळखता मेहुणबारे पोलिस स्टेशनचे पीएसआय योगेश ढिकले यांनी वैयक्तिक आपल्या खिशातून 5000 रुपये तसेच अनिल शंकर पीएसआय यांनी पाच हजार शंभर रुपये व पोलीस कॉन्स्टेबल मथुरे यांनी 2000 रुपयांची मदत केशव राघू माळी यांना दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान आगीमध्ये होत्याचे नव्हते झाले, म्हणून केशव महाजन यांना तातडीने शासनाकडून (government) मदत (Help) मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *