Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रAshadhi Wari 2023 : वारकऱ्यांसाठी खुशखबर, राज्य सरकारची मोठी घोषणा

Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांसाठी खुशखबर, राज्य सरकारची मोठी घोषणा

मुंबई | Mumbai

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला लाखो वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. वारकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. सरकारच्या खर्चातून हे विमा संरक्षण असणार आहे.

- Advertisement -

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; संत श्री महंमद महाराजांच्या दिंडीने पंढरपूरकडे पहिल्यांदाच केले प्रस्थान

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लाखो वारकऱ्यांना यामुळे शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी हे विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये देण्यात येतील. अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरि जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यामध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागचा उद्देश आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करतांना सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या