Thursday, April 25, 2024
Homeजळगावयावल तालुक्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक पाच महिन्यांपासून मानधनाच्या प्रतिक्षेत

यावल तालुक्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक पाच महिन्यांपासून मानधनाच्या प्रतिक्षेत

यावल : Yaval

ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविका (Asha volunteers) व गटप्रवर्तकांना (group promoters) शासनाने पाच महिन्यांपासून (five months) मासिक मानधनसह (stipend) विविध कामांचे देयक अद्यापही दिले नसल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ (Starvation time) आली आहे. आशा स्वंयमसेविकाचे ‘काम चालू, मानधन बंद’ अशी अवस्था होऊन बसली आहे. शासनाने थकित मासिक मानधनासह वाढीव मानधन आठ दिवसांत न दिल्यास काम बंद आंदोलनाचा (Work stoppage movement) इशारा संतप्त आशा सेविकांनी दिला आहे.

- Advertisement -

तुटपुंज्या मानधनावर आरोग्य यंत्रणेचा खंबीरपणे डोलारा पेलणारा कणाच आता मानधनाअभावी पुरता खचून गेला आहे. महागाईने वस्तूंचे दर गगनाला भिडले असताना, घरखर्चासह इतर खर्चाचा मेळ घालायचा कसा, हा प्रश्न आशा सेविकांसमोर उभा ठाकला आहे.

मायबाप सरकारने कोरोना काळातील आमच्या कामाची प्रशंसा करून मानधन वाढीने हातभार लावण्याची घोषणा केली मात्र कोवीड १९ च्या प्रादुर्भाव जसा कमी होत आहे त्या प्रमाणे मानधन हि घोषणा नुसार होत नसल्यामुळे त्यात कपात केली जात असल्यामुळे कामे मोठ्या प्रमाणात असूनही मानधन मिळत नसल्यामुळे आशा स्वंयमसेविका व गटप्रवर्तक आर्थिक संकटात सापडले आहे.

आशा स्वयंसेविकांना ७५ प्रकारची विविध कामे करावी लागत आहेत. ती आजही सुरूच आहेत. ‘हातचे काम सुरू अन् मानधन बंद’ अशी केविलवाणी अवस्था आशांची झाल्याने सणासुदीच्या दिवसांत आशांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. त्यामुळे महागाईमुळे खर्चाचा ताळमेळ घालताना आशांची दुर्दशा होणार हे काही दिवसांतच समजणार आहे.

कोरोना नियंत्रणात मोठे योगदान

आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने कोरोना काळात मोठी जबाबदारी यांच्यावर पडली होती. डॉक्टर्स, पोलीस, शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. जीव मुठीत घेऊन आवश्यक साधने व प्रशिक्षण नसतानाही कोरोना नियंत्रणात त्यांचा खारीचा वाटा आहे. याचा खऱ्याअर्थाने प्रशासनाला विसर पडला आहे.

शासनाने थकित मासिक मानधनासह वाढीव मानधन येत्या आठ दिवसांत दिले नाही, तर कामबंद आंदोलनाचा इशारा यावल तालुक्यातील संतप्त आशा सेविकांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या