Saturday, April 27, 2024
Homeनगरआशा व गटप्रवर्तकांचा 15 तारखेला संप

आशा व गटप्रवर्तकांचा 15 तारखेला संप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आशा व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांसाठी 15 जून रोजी लाक्षणिक संप करून 16 जूनपासून करोना साथ रोगाचे सर्व काम बंद करण्याचा इशारा आयटक संलग्न जिल्हा आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने देण्यात आला.

- Advertisement -

या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांना देण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, कार्याध्यक्षा सुवर्णा थोरात, जयश्री ढगे, निशा गंगावने, वंदना पेहरे, कल्पना शेंडे, कामिनी खेतमाळस, सोनाली धाडगे, रुपाली घुसाळे, रुपाली बनसोडे आदी उपस्थित होते. राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या विविध समस्यांबाबत 15 व 16 जून रोजी लाक्षणिक संप आणि काम बंद आंदोलन घोषित करण्यात आले आहे.

या आंदोलनात अहमदनगर जिल्हा आशा कर्मचारी संघटना देखील उतरणार आहे. राज्यात 72 हजार आशा स्वयंसेविका व 4 हजार गटप्रवर्तक राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आहेत. माहितीचे अचूक संकलन व अहवाल सादरीकरण, लसीकरण, व्हीएचएनएससी सभा, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील सभा ही कामे करावी लागतात. त्याकरिता त्यांना दरमहा चार हजार रुपये शासकीय आदेशानुसार मिळाले पाहिजे. पण ती रक्कम पूर्णत: मिळत नाही. याशिवाय त्यांना विविध कामांचा व इतर कामावर आधारित असलेला मोबदला करोना पूर्वकाळात मिळत होता.

ती रक्कम कामानुसार सरासरी दोन हजार रुपये असते. परंतु त्यांना करोनासंबंधित काम दररोज आठ तास करुन देखील ही रक्कम मिळणे बंद झाली आहे. गटप्रवर्तक या पदवीधर महिला असून,त्यांना पंचवीस आशा स्वयंसेविका सनियंत्रण ठेवावे लागते. त्याकरिता त्यांना दरमहा 11 हजार 625 इतके मानधन मिळते. त्यातील बरीचशी रक्कम ग्रामभेटी देताना प्रवासापोटी खर्च होते. त्यामुळे त्यांना मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या