Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशकेरळची तरुणी ठरली देशातील सर्वात तरुण महापौर

केरळची तरुणी ठरली देशातील सर्वात तरुण महापौर

थिरुवनंतपूरम

केरळमधील एक तरुणी वयाच्या अवघ्या एकवीसव्या वर्षी महापौर बनली आहे. देशातील सर्वांत तरुण महापौर म्हणून तिची नोंद झाली आहे.

- Advertisement -

थिरुवनंतपूरम् महापालिकेच्या महापौर म्हणून माकपच्या आर्या राजेंद्रन् यांची निवड झाली. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशातील सर्वांत तरुण महापौर ठरले होते. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी ते नागपूरचे महापौर झाले होते.

आर्या राजेंद्रन् यांचे थिरुवनंतपूरम् येथील महाविद्यालयात शिक्षण आहे. सध्या त्या अभियांत्रिकीसाठी अभ्यास करीत होत्या, पण त्याआधीच त्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेत आर्या कार्यरत होत्या. आर्या यांनी महापालिकेची निवडणूक प्रथमच लढवली. इतक्या लहान वयात नगरसेवक होण्याची संधी मिळाल्यानंतर शुक्रवारी(25 डिसेंबर) त्यांना महापौर होण्याचा मानही मिळाला. विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस हे देखील वयाच्या 21व्या वर्षीच नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या