Thursday, April 25, 2024
Homeनाशिकलासलगावला कृत्रिम पाणीटंचाई; पाणीपुरवठा समिती बरखास्तीची मागणी

लासलगावला कृत्रिम पाणीटंचाई; पाणीपुरवठा समिती बरखास्तीची मागणी

लासलगाव। वार्ताहर | Lasalgaon

लासलगाव (lasalgaon) विंचूरसह (vinchur) सोळा गाव पाणीपुरवठा (water supply) देखभाल दुरुस्ती समितीच्या मनमानी कारभारामुळे लाभार्थी गावातील नागरीक पिण्याच्या पाण्यासाठी (drinking water issue) त्रस्त झाले आहे.

- Advertisement -

समितीच्या पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे वेगवेगळे कारणे देवून शहरातील जनतेला वेठीस धरले जात आहे. शहराच्या अनेक भागात 15 ते 20 दिवसांनी पाणीपुरवठा (water supply) होतो. पाण्यासाठी नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व प्रकारास पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती समिती तत्काळ बरखास्त करून या समितीचे पदाधिकारी नव्याने नियुक्त करण्यात यावे अशी मागणी शिवसेना निफाड तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील (Shiv Sena Niphad taluka president Prakash Patil) यांनी पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांना दिलेल्या निवेदनाद्वारे (memorandum) केली आहे.

प्रकाश पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाणीपुरवठा समितीच्या (Water Supply Committee) दुर्लक्षामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा (Artificial water scarcity) सामना करावा लागत आहे. या पाणीटंचाई (water scarcity) बाबत समितीच्या पदाधिकार्‍यांना विचारले असता पाईपलाईन फुटली, लाईट गेली, झाड पडले, वायर तुटली, पोल पडले, मोटार जळाली, मोटारचे वॉलसिल गेले, मोटारची बेरींग गेली, वॉल खराब झाला, लाईटबिल थकल्यामुळे कनेक्शन कट झाले अशी एक ना अनेक कारणे पुढे केली जात आहे. त्यामुळे नागरीक समितीस कंटाळले आहे.

काही भागात गटारीचे पाणी मिश्रित अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. लाभार्थी गावात 15 ते 20 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांनी पाणीपुरवठा होतो. याशिवाय पाण्याचे शुद्धीकरण (Water purification) व्यवस्थित होत नसल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. नागरीकांनी किती दिवस पिण्याचे पाणी विकत घ्यायचे. तरी आपण लाभार्थी गावातील नागरीकांना दररोज शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी जेणेकरून पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागणार नाही. समितीच्या अकार्यक्षम कामामुळे नागरीक व महिला हैराण झालेले आहे.

पाणी प्रश्न (water issue) ही अतिशय गंभिर बाब झाली आहे. त्यामुळे ढिसाळ कारभार करणारी लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती समिती आपण तत्काळ आपल्या अधिकारात बरखास्त करून कार्यक्षम अधिकार्‍यांची नेमणूक करून नागरीकांना नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी दररोज मिळावे ही विनंती. आपणास यापुर्वीही निवेदनाच्या माध्यमातून तीन वर्षापासून पाठपुरवठा करत आहेत पण आपण याकडे लक्ष देताना दिसत नाही. तरी आपण वरील विषयाकडे गांभिर्यपूर्वक लक्ष न दिल्यास नागरीकांच्या रोषास आपणास सामोरे जावे लागेल याची आपण नोंद घ्यावी.

याविषयी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या शिष्ट मंडळाला अश्वस्त केले की लवकरच लासलगाव-विंचूरसह 16 गाव समितीवर येवल्याच्या 38 गाव योजनेच्या धर्तीवर अधिकारी नेण्यात येईल. नागरीकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल. याप्रसंगी शहर प्रमुख प्रमोद पाटील, तालुका समन्वयक केशव जाधव, गणप्रमुख उत्तम वाघ, संदिप पवार, सागर काळे, सुनील पवार, अमोल काळे, जनार्दन पवार आदींसह शिवसैनिक व नागरीक उपस्थित होते. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री,

पाणीपुरवठा मंत्री, कृषीमंत्री तथा शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क मंत्री, जिल्हाधिकारी, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रा.पं. उप मुख्य कार्यकारी अधिकारी, निफाड उपविभागिय अधिकारी, पं.स. चे गटविकास अधिकारी, लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आल्याचे निफाड तालुका पूर्व भाग शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या