Saturday, April 27, 2024
Homeनगरकोट्यावाधी रुपयांच्या अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप न झाल्याचा संशय

कोट्यावाधी रुपयांच्या अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप न झाल्याचा संशय

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्गापासून बचाव होण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने

- Advertisement -

प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांना होमिओपॅथी अर्सेनिक अल्बमचा डोस देण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार नगर झेडपीने ही जिल्हा पातळीवरून ग्रामीण भागातील 38 लाख 41 हजार नारिकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात या गोळ्या वितरित केल्या.

मात्र, आता तीन महिन्यांनंतर या गोळ्या अद्याप नागरिकांपर्यंत पोहचल्याचे नसल्याचे जिल्हा परिषद सदस्यांनी निदर्शनास आणून दिलेले आहे. यामुळे सरकारचे अर्सेनिक अल्बमवरील 2 कोटी 48 लाखांचा निधी पाण्यात गेल्याची भिती व्यक्त होत आहे. त्याच सोबत ग्रामीण भागात करोना संसर्गही वाढत आहे.

मागील वर्षी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने करोना संसर्ग रोखण्यासाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथी औषध असणार्‍या अर्सेनिक अल्बमच्या गोळ्याचे वाटप करण्याचे ठरले. योजनेची घोषणा झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनंतर नगर जिल्हा परिषदेत त्याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्यक्षात डिसेंबर महिना उजेडला.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या गोळ्यांचे जिल्हास्तरावरून पंचायत समिती पातळीवर वितरित करण्यात आल्या. जिल्हा पातळीवरून हे औषध पंचायत समिती पातळीवर पाठविण्यात आल्यानंतर गोळ्याचे वितरण झाले की नाही, हे तपासण्याची साधी दक्षताही जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने घेतली नाही.

दरम्यान, तीन महिन्यांनतर एप्रिल महिना उजाडला असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाची दुसरी लाट आली असून अद्यापपर्यंत नागरिकांच्या हाती या गोळ्या पडल्या नसल्याचे जिल्हा परिषद सदस्यांच्या निदर्शनास आले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेशी निगडित असणार्‍या एका वॉटसअप ग्रुप सदस्य संदेश कार्ले यांनी त्यांच्या गावात ग्रामसेवकाला गोळ्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना अर्ध्या तासात त्यांच्या घरी गोळ्या पाठविण्यात आल्या.

तर सदस्या हर्षदा काकडे यांनीही त्यांच्या घरी गोळ्या आल्या नसल्याचे स्पष्ट केले. सदस्य शरद नवले यांनी तर या गोळ्यांबाबत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाला पत्र देवूनही त्यांना माहिती देण्यात आली असल्याचे सांगितले. दरम्यान, या विषयावर सदस्य राजेश परजणे यांनी मागील आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चा करण्याची मागणी केली होती.

मात्र, त्यावेळी हा विषय घिसडघाई करून चर्चेविना थांबविण्यात आला. सदस्य जालींदर वाकचौरे यांनी हा विषय वारंवार उपस्थित केलेला आहे. मात्र, प्रशासनाने त्यांना कोणतीच माहिती दिलेली नाही. जर तालुका पातळीवरून जिल्हा परिषद सदस्यांच्या घरी या गोळ्या पोहचल्या नसतील तर सामान्यांना या गोळ्या कधी मिळणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

यामुळेही करोना वाढीची शक्यता

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने या गोळ्या खाली पाठविल्यानंतर त्याचे काय झाले याची खातरजमा न झाल्याने या गोळ्या उशीरा वाटप झाल्या अथवा झाल्याच नाहीत, याबाबत कोणतीच माहिती प्रशासनाकडे नाही. जर ग्रामीण भागात वेळीच अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या गेल्या असत्या आणि वेळीच त्याचे वाटप झाले असते, निम्म्याने करोना संसर्गाचा धोका कमी झाला असता, असे या विषयातील एका तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

अकोले तालुक्यात वेळीच या गोळ्यांचे वाटप न झाल्याने एका ग्रामसेवकाला निलंबनाला समोरे जावे लागले. आता जिल्ह्यात अशा प्रकारे कामात कुचराई करणार्‍या किती कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करणार असा सवाल सदस्य जालींदर वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे.

असे झालेले आहे, तालुकानिहाय वाटप

अकोले 2 लाख 95 हजार 729, संगमनेर 4 लाख 22 हजार 135, कोपरगाव 2 लाख 37 हजार 179, राहाता 2 लाख 86 हजार 87, श्रीरामपूर 1 लाख 98 हजार 218, राहुरी 2 लाख 67 हजार 766, नेवासा 3 लाख 35 हजार 211, शेवगाव 2 लाख 45 हजार 614, पाथर्डी 2 लाख 58 हजार 109, कर्जत 2 लाख 17 हजार 638, जामखेड 1 लाख 65 हजार 430, श्रीगोंदा 3 लाख 13 हजार 325, पारनेर 2 लाख 73 हजार 334, नगर 3 लाख 26 हजार 220 एकूण 38 लाख 41 हजार 995.

- Advertisment -

ताज्या बातम्या