Wednesday, April 24, 2024
Homeनगरथकबाकीचा 4 था हफ्ता जूनच्या पगारासोबत..!

थकबाकीचा 4 था हफ्ता जूनच्या पगारासोबत..!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना दिनांक 1 जुलै 2022 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता जून, 2023 च्या वेतनासोबत, निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावा असे परिपत्रक वित्त विभागाने जारी केले आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारी कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

निवृत्तिवेतनधारकांना निवृत्तिवेतनाच्या थकवाकीच्या 4 च्या हप्त्याची रक्कम जून, 2023 च्या निवृत्तिवेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी. राज्य शासकीय कर्मचार्‍यांच्या थकबाकीच्या 4 थ्या हप्त्याची रक्कम माहे जून 2023 च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

शासन अधिसूचना वित्त विभाग, दिनांक 30 जानेवारी, 2019 अन्वये 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी सन 2019-20 पासून पुढील 5 वर्षांत, 5 समान हप्त्यांत कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक वित्त विभाग, दिनांक 20 फेब्रुवारी, 2019 अन्वये विहित केली आहे. तसेच राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या कर्मचार्‍यांच्या थकबाकीची रक्कम 5 वर्षात, 5 समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक 30 मे, 2019 अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

तसेच निवृत्तिवेतनाच्या थकबाकीची रक्कम 5 वर्षांत 5 समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याचे दिनांक 24 जानेवारी 2019 आणि दिनांक 1 मार्च, 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित केले आहे.

राज्यात कोविड 19 (करोना) या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसूली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन शासन निर्णय वित्त विभाग, दिनांक 09 मे, 2022 अन्वये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 1 जुलै 2021 रोजी देय असलेल्या 7 व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसर्‍या हप्त्याचे प्रदान दिनांक 09 मे, 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे. तसेच या शासन निर्णयामध्ये उर्वरीत देय असलेल्या हप्त्यांचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.

- Advertisment -

ताज्या बातम्या