Sunday, April 28, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार येथे दोन गटात सशस्त्र हाणामारी

नंदुरबार येथे दोन गटात सशस्त्र हाणामारी

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील कंजरवाडा (Kanjarwada area) परिसरात आज दि. 22 रोजी दोन गटात सशस्त्र हाणामारी (Fighting) झाल्याची घटना घडली. यात घरासह वाहनाची मोठया प्रमाणात तोडफोड झाल्याचे समजते. कौटूंबिक वादातून (family dispute) दोन गट आमने सामने भिडले होते. याबाबत उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात (police station) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

- Advertisement -

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील कंजरवाडा (Kanjarwada area) परिसरात आज दि. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजेच्यसुमारास कौटूंबिक वादातून (family dispute) दोन गटात सशस्त्र हाणामारी (Fighting) झाली.यावेळी मोठया प्रमाणावर वाहनांची व घराची तोडफोड करण्यात आली. या हाणामारीमुळे परिसरातील नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण (atmosphere of terror) निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (Sub-Divisional Police Officer) सचिन हिरे,(Sachin Hiray) पोलीस निरीक्षक किरण खेडकर, उपपोलीस निरीक्षक प्रविण पाटील हे तात्काळ पथकासह दाखल झाले होते. त्यांनी परिस्थिती नियंत्रण मिळवले. हाणामारीच्या घटनेनंतर काहीजणांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे कळते. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या