Friday, April 26, 2024
Homeनाशिकमेहनत रंग लायी! रोइंगपटू दत्तू भोकनळ यांना अर्जुन पुरस्कार

मेहनत रंग लायी! रोइंगपटू दत्तू भोकनळ यांना अर्जुन पुरस्कार

नाशिक | Nashik

नाशिकचे सुपुत्र दत्तू भोकनळ यांना राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा प्रकारातील मानाचा असा ‘अर्जुन पुरस्कार’ आज घोषित झाला. रोइंग या खेळात त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केली असून देशासाठी त्याने पदकांची कमाई केली आहे. आज त्याच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने रंग चढला आहे.

- Advertisement -

दत्तू यास अर्जुन पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की दत्तूचा अर्जुन पुरस्कारापर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षमय असा आहे. मोलमजुरी करत शिक्षण घेतले. पुढे सैन्यात दाखल होऊन तिथे रोइंग शिकला आणि त्यानंतर ऑलिम्पिक असो, आशियाई क्रीडा स्पर्धा असो किंवा इतर आंतरदेशीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उंचावले आहे.

रिओ ऑलम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व, आशियाई स्पर्धेतील सांघिक प्रकारात सुवर्ण असा त्याचा हा आलेख उंचावणारा आहे. यातून नवखेळाडूंना नक्कीच यातून प्रेरणा मिळेल. नाशिकच्याच नव्हे तर राज्याच्या शिरपेचात हा मानाचा तुरा यानिमित्ताने रोवला गेल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या