Saturday, April 27, 2024
Homeनगरनसलेल्या गाळ्यांना कराच्या नोटिसा !

नसलेल्या गाळ्यांना कराच्या नोटिसा !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चितळेरोडवर नेहरू मार्केट ही अत्यंत देखणी वास्तू होती. यामध्ये भाजी विक्रेते बसत तर काही गाळे होते.

- Advertisement -

गेला अकरा वर्षांपूर्वी हि वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. तत्कालीन आयुक्त यांनी ही वास्तू पाडताना गाळेधारकांना शब्द दिला होता की, एक वर्षांमध्ये नवीन वास्तू बांधून मिळेल व जे गाळेधारक आहेत त्यांना प्राधान्याने गाळे देण्यात येतील. पण सध्या ही जागा मोकळी पडलेली आहे. तेथे गाळे अस्तित्वात नाही, तरी महानगरपालिकेने घरपट्टी भरावी म्हणून नोटीस पाठवली आहे.

ती रद्द करावी अशी मागणी चितळेरोड हातगाडी व भाजी विक्रेता संघटना अध्यक्ष शुभम झिंजे, तसेच नेहरू मार्केट कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष संजय झिंजे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले आहे. या निवेदनावर पुरोहित, बाळासाहेब तरोटे, सतीश तरोटे, विजय चौधरी आदी गाळेधारकांच्या सह्या आहेत.

शुभम झिंजे यावेळी म्हणाले, अनेक वेळा आंदोलने झाली, टेंडर निघाले, शेवटी महापालिकाचे भाजी मार्केट व व्यावसायिक संकुल बांधण्याचा निर्णय दोन वर्षपूर्वी घेण्यात आला, पण यावर कार्यवाही होऊन कधी गाळे मिळणार व गाळे नसतानाही मनपा किती वर्षे घरपट्टीचे बिले पाठविणार असा सवाल त्यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या