Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशसोमनाथ मंदिराखाली आहे तीन मजली इमारत आणि बौद्ध गुफा - पुरातत्व...

सोमनाथ मंदिराखाली आहे तीन मजली इमारत आणि बौद्ध गुफा – पुरातत्व विभाग

अहमदाबाद

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराखाली तीन मजली इमारत आणि बौद्ध गुफा असल्याचे पुरातत्व विभागाने

- Advertisement -

सांगितले आहे. आयआयटी गांधीनगर आणि 4 संस्थांच्या पुरातत्व तज्ञांनी हा शोध लावला आहे. हा शोध भारताचे पंतप्रधान आणि सोमनाथ मंदिराचे ट्रस्टी नरेंद्र मोदी यांच्या आदेशावर करण्यात आला आहे. एक वर्षापूर्वी त्यांनी दिल्लीमध्ये झालेल्या एका बैठकीदरम्यान पुरातत्व विभागाला हा तपास करण्याचे आदेश दिले होते.

पुरातत्व विभागाने एक वर्ष केलेल्या तपासानंतर 32 पानांचा अहवाल सोमनाथ ट्रस्टला दिला आहे. र्यामध्ये सांगण्यात आले आहे की, मंदिराखाली आकाराची एक इमारत आहे. तसेच, सोमनाथ मंदिराच्या दिग्विजय द्वारापासून काही अंतरावर असलेल्या सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ बौद्ध गुफा आहेत.

तज्ञांनी 5 कोटी रुपयांच्या आधुनिक मशीनद्वारे तपासणी केली. जमिनीपासून 12 मीटर खोल जीपीआर इन्वेस्टिगेशन केल्यानंतर समजले की, मंदिराच्या खालीदेखील एक इमारत आणि प्रवेशद्वार आहे.

5 राजांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता

असे म्हटले जाते की, सर्वात आधी एक मंदिर अस्तित्वात होते. दुसर्‍यांना सातव्या शतकात वल्लभीच्या मैत्रक राजाने याठिकाणी मंदिर बांधले. आठव्या शतकात सिंधच्या अरबी गव्हर्नर जुनायदने या मंदिराला तोडण्यासाठी आपले सैन्य पाठवले. यानंतर प्रतिहार राजा नागभट्टने 815इसवीमध्ये या मंदिराला तिसर्‍यांना बनवले. याच्या अवशेषांवर मालवाचे राजा भोज आणि गुजरातचे राजा भीमदेवने चौथ्यांदा निर्माण केले. पाचव्यांदा 1169 मध्ये गुजरातचे राजा कुमार पाल यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.

सध्याचे मंदिर सरदार वल्लभ भाई पटेल यांनी बांधले

मुघल राजा औरंगजेबाने 1706 मध्ये मंदिराला पाडले होते. जूनागडला भारताचा भाग बनवल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांनी जुलै 1947 मध्ये सोमनाथ मंदिराला परत बांधण्याचे आदेश दिले. आता असलेले हे नवीन मंदिर 1951 मध्ये बनवण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या