Saturday, April 27, 2024
Homeनाशिकलेखाधिकार्‍याची अरेरावी; पेन्शनधारक संघटनेकडून कारवाईची मागणी

लेखाधिकार्‍याची अरेरावी; पेन्शनधारक संघटनेकडून कारवाईची मागणी

डांगसौंदाणे । वार्ताहर | Dangsaundane

बागलाण तालुका (baglan taluka) पेन्शनधारक संघटनेने (Pensioners Association) पंचायत समितीचे (panchayat samiti) अर्थ विभागाचे लेखापाल डी. सी. पाटील (Finance Department Accountant D. C. Patil) यांच्या मनमानीविरोधात गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे (Group Development Officer Pandurang Kolhe) यांना निवेदन (memorandum) देत कारवाई करण्याची केली आहे.

- Advertisement -

बागलाण पंचायत समितीच्या (Baglan Panchayat Samiti) अर्थ विभागात गेली अनेक वर्षे लेखापाल म्हणून कार्यरत असलेले डी. सी. पाटील यांच्या मनमानीविरोधात पेंशनधारक संघटनेने आक्रमक भुमिका घेतली आहे. तालुका पेंशनधारक संघटनेचे अध्यक्ष बाजीराव पाटील हे जिल्हा परिषदेकडून (zilha parishad) आलेले पेंशनबाबत पंचायत असलेली माहिती विचारण्यासाठी अर्थ विभागाच्या कार्यालयात गेले असता लेखाधिकारी पाटील यांनी अध्यक्ष यांना अपमानस्पद वागणूक (Disrespectful behavior) देत अरेरावी करण्याचा प्रकार घडला.

दोन-तीन वर्षापूर्वी आपल्याच वरिष्ठांसोबत कार्यालयातच मारहाण (beating) करण्याचा प्रकार पाटील यांच्याबाबत झालेला असतांना त्यावेळी कुठलीही कार्यवाही प्रशासनाने केली नव्हती. त्यामुळे पाटील यांच्या विरोधात आता पेंशनधारक संघटनांनी दिलेल्या निवेदनावरून प्रशासन काय कार्यवाही करते की, या ही वेळेस पाठीशी घालते? असा सवाल उपस्थित केला.

संघटनेच्या पदाधिकारी व पेंशनधारकांशी केलेले गैरवर्तनावर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर संघटनेचे सरचिटणीस पंढरीनाथ बोरसे, एकनाथ जाधव, आनंदराव पाटील, बाळू देवरे, रामदास जाधव आदींसह पेंशन धारकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या