Wednesday, April 24, 2024
Homeनगरआरडगाव परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

आरडगाव परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) आरडगांव (Aradgav) येथे अकरावीत शिकणार्‍या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला (Minor Girl) कशाचे तरी आमिष (Lure) दाखवून तिला तिघाजणांनी मोटरसायकलवर बसवून पळवून नेले. दि. 16 जून रोजी मध्यरात्री ही घटना घडली आहे.

- Advertisement -

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) आरडगांव (Aradgav) परिसरात ती 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी (Minor Girl) तिच्या आईवडिलांच्या सोबत राहते. ती इयत्ता अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दि. 16 जून रोजी मध्यरात्री तीन वाजे दरम्यान तीन आरोपींनी मिळून त्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला (Minor Girl) कशाचे तरी आमिष (Lure) दाखवून मोटरसायकलवर बसवून पळवून नेले. त्या मुलीच्या आईवडिलांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. अखेर त्यांनी राहुरी पोलिसांत (Rahuri Police) धाव घेतली.

त्या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत संशयीत आरोपी म्हणून दत्तात्रय कैलास मोरे, किशोर साळुंखे, शरद सोनवणे तिघे रा. वरखेड, ता. गंगापूर, जिल्हा औरंगाबाद या तिघांवर अल्पवयीन मुलीचे अपहरण (Abduction of a mMinor Girl) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या