Monday, April 29, 2024
Homeनगर7 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

7 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जलजीवन योजनेतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात नगर जिल्ह्यातील काही योजनांचा समावेश आहे.

- Advertisement -

या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक ऋषिकेश यशोद यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोपरगाव तालुक्यातील वारी कान्हेगाव, माळेगाव थडी पाणीपुरवठा योजना, संगमनेर तालुक्यातील निमगाव भोजापूर व 3 गावे पाणीपुरवठा योजना तसेच जवळेकडलग व 1 गावे पाणी पुरवठा योजना, गुंजाळवाडी व 1 गावे पाणीपुरवठा योजना. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक पाणी पुरवठा योजना, कर्जतमधील वाढीव मिरजगाव पाणीपुरवठा योजनेचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या