Friday, April 26, 2024
Homeनाशिक'निमा'च्या सामंजस्याच्या भूमिकेबद्दल कौतुक

‘निमा’च्या सामंजस्याच्या भूमिकेबद्दल कौतुक

नाशिक | प्रतिनिधी Nashik

निमा अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी शुक्रवारी सर्व उद्योजक संघटना तर्फे औद्योगिक वसाहत बंदची घोषणा करण्यात आली होती मात्र कामगारांचे नुकसान नको म्हणून निमा तर्फे सदरहू बंद हा स्थगित करण्याची सामंजस्याची भूमिका घेतल्याने भाजप प्रदेश महामंत्री तसेच नाशिक विभागाचे संघटन सचिव विजय चौधरी यांनी नाशिक दौऱ्यावर असतांना निमा कार्यालयावर भेट देऊन निमाच्या भूमिकेचे कौतुक केले.

- Advertisement -

यावेळी उद्योजकांशी चर्चा करतांना चौधरी यांनी निमाने उद्योग बंदचा मागे घेतलेल्या निर्णया बद्दल आभार व्यक्त केले.निमाने अतिशय योग्य आणि छान भूमिका आपण घेतली असे मत व्यक्त करत आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आभार मानले व आम्ही गुन्हेगारांना कधीही पाठीशी घालणाऱ्यातले नाही,पुन्हा येऊ आणि आपल्या सुकाणू समिती निमा पदाधिकारी यांच्या समवेत व सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आपण झालेला विषय व्यवस्थित रित्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करूअसे आश्वासन दिले. याप्रसंगी उपस्थित निमा पदाधिकारी व सदस्यांनी झालेल्या सर्व घटनेचे वर्णन पुनः त्यांना सांगितले.

नाशिक जिल्ह्याचे प्रभारी राजेंद्र गावित तसेच सहसचिव भोळे, बच्छाव, निखिल पवार, प्रशांत जाधव आदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे,राजेंद्र वडनेरे, विजय जोशी, कैलास पाटील, विराज गडकरी, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या