Saturday, April 27, 2024
Homeनाशिकखुशखबर! 'इतक्या' अनुकंपा धारकांना नियुक्ती आदेश

खुशखबर! ‘इतक्या’ अनुकंपा धारकांना नियुक्ती आदेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य शासनाच्या (State Government) जिल्ह्यातील विविध 37 विभागातील 275 अनुकंपा धारकांना नियुक्ती आदेश दिले असून महिनाभरात अजून 200 ते 300 नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. यासाठी ज्या विभागांमध्ये अनुकंपा धारकांना नियुक्ती देणे बाकी आहे, अशा विभागांनी यावर काम करून आपल्या विभागाचे ‘झिरो पेंडन्सी’ (Zero Pendency) काम करावे, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी दिले…

- Advertisement -

जिल्ह्यातील महसूल विभागासह इतर विभागांमधील अनुकंपा उमेदवारांना त्यांच्या अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीचे आदेश राज्याचे बंदरे  व खनिज कर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.१०)नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

पालकमंत्री भुसे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री  यांनी अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 75 हजार नोकऱ्या देण्याचा संकल्प केला आहे.

ट्विटरचे बहुचर्चित ‘ब्ल्यू टीक’ फिचर भारतात लॉन्च; ‘या’ सुविधा मिळणार

विविध खात्यांच्या माध्यमातून नोकर भरती संदर्भात हे काम सुरू असून अनुकंपा तत्त्वाखालील पात्र लाभार्थ्यांना न्याय हक्क देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नाशिक महसूल विभागात देखील याची अंमलबजावणी सुरू असून ज्या अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र आदेश दिलेले नाही व जे लाभार्थी वंचित आहेत त्यांना नियुक्त पत्र देण्याचे काम सुरू केले आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव; तिघांवर गुन्हा दाखल

यामध्ये आज 37 विभागांमध्ये 275 उमेदवारांना नियुक्ती आदेश पत्र देण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेने 127 उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले असून उर्वरित उर्वरित विभागांनीही हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे व मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेला संकल्प पूर्ण करावा असे आवाहन भुसे यांनी केले.

काँग्रेसकडून पटोलेंना ‘ना-ना’?

ज्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. अशा उमेदवारांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे काम व्हावे. त्या कुटुंबाचा विकास व्हावा,हा उद्देश आहे. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व इतर काही विभागांचे  हे काम अपूर्ण असून त्यांनी ते पूर्ण करावे. 

…म्हणून कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक रद्द होऊ शकते

महिनाभरात अजून 200 ते 300 लोकांना नियुक्ती आदेश दिले जाणार असून पंधरा दिवसांनी याबाबतचा आढावा घ्यावा,असे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आपल्या विभागात झिरो पेंडन्सी हे काम कसे राहील असे काम करण्याच्या  सूचनाही त्यांनी दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या