Friday, April 26, 2024
Homeनगर275 समुदाय आरोग्य अधिकार्‍यांना नेमणुका

275 समुदाय आरोग्य अधिकार्‍यांना नेमणुका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गुरूवारी जिल्ह्यातील रिक्त असणार्‍या आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात समुपदेशनाद्वारे गुणवत्तेनुसार 275 जणांना नियुक्त्या दिल्या.

- Advertisement -

जिल्ह्यात रिक्त असणार्‍या 427 जागांवर या नियुक्त करण्यात येणार आहेत. यावेळी सामाजिक अंतराचे पालन करण्यात आले. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमातंर्गत कंत्राटी तत्वावर समुदाय अरोग्य अधिकारी यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ नाशिक यांनी घेतलेल्या परीक्षेचा निकालानुसार आणि सहायक संचालक आरोग्य यांच्या सुचनांनुसार काल समुपदेशनाव्दारे नियुक्त्या देण्यात आल्या.

यासाठी जिल्हा परिषद सभागृहात 75 चा लॉट पाडून या नियुक्त्या देण्यात आल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संदीप सांगळे, डॉ. विनोद काकडे ,डॉ. प्रकाश लाळगे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अमोल शिंदे, शिवाजी भिटे आदी उपस्थित होते.c

- Advertisment -

ताज्या बातम्या