Saturday, April 27, 2024
Homeनाशिकजिल्हा परिषदेत अनुकंपा धारकांच्या नियुक्त्या

जिल्हा परिषदेत अनुकंपा धारकांच्या नियुक्त्या

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य शासनाने अनुकंपा नियुक्ती Appointment of Compassionate Holders संदर्भातील भरती मर्यादा २० टक्के केल्याने जिल्हा परिषद सेवेतील मयत सेवकांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर सामावून घेण्याची भरती प्रक्रिया तत्काळ राबविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ZP CEO- Leena Bansod यांनी दिले होते.

- Advertisement -

याला अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या Nashik Zilla Parishad नवीन सभागृहात प्रतीक्षासूचील १३९ अनुकंपा धारकांना ज्येष्ठता सूचनेनुसार व उपलब्ध पदानुसार बनसोड यांच्या उपस्थितीत समुपदेशनाने नियुक्त्या देण्यात आल्या.

जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर लिहा परिषदेतील मृत सेवकांच्या वारसांना जिल्हा परिषद सेवेत सामावून घेतल्यामुळे अनुकंपा नियुक्ती धारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या नियुक्त्यांमध्ये परिचर सवंर्गातुन 91, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गातुन 04 , औषध निर्माण अधिकारी संवर्गातुन 04 , आरोग्य सेवक महिला संवर्गातुन 01 ,आरोग्य सेवक पुरुष संवर्गातुन 02 , कनिष्ठ अभियंता (इवद) संवर्गातुन 02 , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (इवद) संवर्गातुन 5 , कनिष्ठ अभियंता (ग्रापापु) संवर्गातुन 01,

पर्यवक्षिका (अंगणवाडी) संवर्गातुन 01, पशुधन पर्यवेक्षक संवर्गातुन 01, वरिष्ठ सहाय्यक लेखा संवार्गातुन 07 ,कनिष्ठ सहाय्यक लेखा संवार्गातुन 02, प्राथमिक शिक्षक संवर्गातुन 17 व विस्तार अधिकारी (कृषि) संवर्गातुन 01 अशी एकुण 139 उमेदवारांना तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यातून १० टक्के या प्रमाणे आरोग्य सेवक २५ व ग्रामसेवक ७ यांना समुपदेशनाद्वारे त्यांच्या इच्छित स्थळी नियुक्ती पदस्थापनेचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी निर्गमित केले.

या प्रक्रियेमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या सह सहायक प्रशासन अधिकारी उत्तम चौरे, रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी निवृत्ती बगड, रणजित पगारे, नितीन पवार, सामान्य प्रशासन विभागातील गौतम अग्निहोत्री, साईनाथ ठाकरे, किशोर पवार, मंगेश केदारे,

सचिन विंचूरकर, भास्कर कुंवर, विशाल कामडी, प्रमोद ढोले, पंडित कटारे, जगदीश कर्डक, सुनील थैल, कानिफनाथ फडोळ, योगेश कुमावत, गोविंद पाटील, दत्तात्रय बेलेकर, प्रमोद जाधव, अशोक खेडुलकर, स्वप्नील कानडे यांच्यासह सामान्य प्रशासन व ग्रामपंचायत विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यांनी परिश्रम घेतल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी विशेष करत जिल्हा परिषद सेवेत नव्याने सहभागी झालेल्या सर्व अनुकंपा धारक व ग्रामपंचायत सेवक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या