Thursday, April 25, 2024
Homeनाशिकदिशाच्या अशासकीय सदस्यांना नियुक्तीपत्र

दिशाच्या अशासकीय सदस्यांना नियुक्तीपत्र

दे. कॅम्प । Deolali Camp (वार्ताहर)

केंद्र शासनाच्या योजनांअतर्गंत सुरु असलेल्या जिल्ह्यातील विविध विकास कामांना अंकुश ठेवणे, सुरु असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीवर नियुक्त केलेल्या जिल्ह्यातील नऊ अशासकीय सदस्यांना खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

- Advertisement -

जिल्ह्यात सुरु असलेले विकासकामे दर्जेदार होण्यासाठी नवनिर्वाचित सदस्य निश्चितच उत्तम काम करतील, असा विश्वास यावेळी खा. गोडसे यांनी व्यक्त केला. केंद्र शासनाने मागील काही महिन्यांपूर्वी जिल्ह्याच्या दिक्षा समिती अध्यक्षपदी खा. गोडसे यांची नियुक्ती केलेली आहे. जिल्हा पातळीवर दिशा समिती अंतर्गत 45 विविध योजना राबविण्यात येतात. सदर योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे. योजनांच्या कामाविषयी जागृकता राखणे, कामाचा दर्जा टिकून राहणेकामी तसेच योजनांवर अंकुश ठेवण्यासाठी व योजनांचा सखोल आढावा घेण्याचे काम दिशा समितीमार्फत करण्यात येते.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीचे अध्यक्ष खा. गोडसे यांनी प्रकल्प अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे नऊ सदस्यांच्या नावाची शिफारस केली होती. या नावांना नुकतीच मान्यता देण्यात आली असून नवनिर्वाचित नऊ अशासकीय सदस्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यामध्ये सिन्नर तालुक्यातील रंजना नानासाहेब शेळके, मनोज निवृत्ती महात्मे, इगतपुरी तालुक्यातील राजश्री सुरेश जमदडे, किरण तुकाराम वारघडे, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विनायक माळेकर, धिरज पागी, नाशिक तालुक्यातील नितीन जगताप यांचा समावेश आहे. दीपक श्रीखंडे आणि रत्ना ज्ञानेश्वर महाले यांना याआधीच नियुक्ती पत्र देण्यात आलेले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या