प्रशासक नेमण्याचे अधिकार बीडीओंना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना आहे, परंतु नगर येथील मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी हा अधिकार आता तालुकास्तरावर गटविकास अधिकार्‍यांना दिला आहे. त्यामुळे ऑगस्टअखेर जिल्ह्यातील मुदत संपणार्‍या 283 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची जबाबदारी गटविकास अधिकार्‍यांवर असणार आहे.

राज्यात करोनाच्या संकटामुळे मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरकारी अधिकारी नेमण्याच्या सूचना आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना प्रशासक नेमण्याचे अधिकार देण्यात आले.

त्या अनुषंगाने नगर जिल्ह्यात जुलैमध्ये 7 ग्रामपंचायतींची मुदत संपली, तेथे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी प्रशासक म्हणून विस्तार अधिकार्‍यांची नेमणूक केली. त्यानंतर ऑगस्ट अखेर जिल्ह्यातील 283 ग्रामपंचायतीची मुदत संपणार होती, परंतु या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी हे अधिकार तालुकास्तरावर गटविकास अधिकार्यांना बहाल केले आहेत. यात विस्तार अधिकारी दर्जाचा अधिकारी असेल प्रशासक राहणार आहे.

प्रशासकावर कारवाईचा अधिकार सीईओंना

नेमलेल्या प्रशासनाकडून गैरवर्तन झाल्यास त्याला हटविण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना असतील. याशिवाय ज्या दिवशी विधिग्राह्यरित्या गठीत झालेली ग्रामपंचायत अस्तित्वात येईल त्या दिवशी प्रशासकाचे अधिकार आपोआप संपुष्टात येतील,असेही या आदेशात म्हटले आहे.

या ठिकाणी येणार प्रशासक

राहुरी 39, नेवासा 39, राहाता 11, कर्जत 55, पाथर्डी 46, श्रीरामपूर 15, संगमनेर 34, पारनेर 8, शेवगाव 32 आणि नगर 4 असे 283.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *