Monday, April 29, 2024
Homeनाशिकखावटी योजनेच्या लाभासाठी 30 जून पर्यंत अर्ज सादर करावे

खावटी योजनेच्या लाभासाठी 30 जून पर्यंत अर्ज सादर करावे

नाशिक | Nashik

महाराष्ट्र व कामगार दिनाचे (Labers day) औचित्य साधुन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते खावटी अनुदान वाटप (Scaffolding grant allocation) योजनेचा प्रत्यक्ष लाभ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

- Advertisement -

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा, देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव व चांदवड या तालुक्यातील अनुसूचित जमातींच्या (Sheduled Tribe) गरजू कुटुंबांनी 30 जून 2021 पर्यंत अर्ज सादर करावे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मीना (Project Officer Vikas Meena) यांनी कळविले आहे.

कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील खावटी योजनेचा लाभ घेण्यासाठी यापुर्वी ज्या अनुसूचित जमातीच्या लोकांनी अर्ज सादर केले आहे. त्यांचे सर्वेक्षण करून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या अर्जदारांव्यतिरिक्त विधवा, अपंग, अनाथ, अनाथांचे संगोपन करणारे तसेच गरजू लाभार्थ्यांनी जवळच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये (Goverment Ashram schools) प्रत्यक्ष उपस्थित राहून विहित नमुन्यातील अर्ज सादर करावे. अर्जासोबत प्रामुख्याने अर्जदाराचे आधारकार्ड,(Adharcard) अनुसूचित जमातीचे असल्याबाबतचा पुरावा (जातीचा दाखला), रेशनकार्ड, रहिवासी दाखला व बँक खाते पासबूक इत्यादींची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

खावटी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्यक्ष दोन हजार रूपये लाभ स्वरूपात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून, दोन हजार रूपये किराणा स्वरूपात साहित्य वाटप करण्याचेही नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती श्री. मीना यांनी दिली .

- Advertisment -

ताज्या बातम्या