Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedकलाकृती सादर करण्याचे कलाकारांना आवाहन

कलाकृती सादर करण्याचे कलाकारांना आवाहन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या काळामध्ये (26,27 व 28 मार्च 2021) कुसुमाग्रज नगरीमध्ये नाशिकमधील चित्रकार, शिल्पकार, व्यंग चित्रकार, सुलेखनकार अशा कलाकारांच्या कलाकृतींचे समग्र कलादर्शन प्रदर्शन होणार आहे.

- Advertisement -

प्रत्येक कलेचा साहित्याशी असणारा अंगभूत संबंध आणि त्यामधून कलाकारांचे अनोखे मनोगत यातून व्यक्त होणार आहे. नाशिकमध्ये सर्वदूर आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे कलाकार असून त्यांच्या मनोवेधक कलाकृती या निमित्ताने तमाम नाशिककर आणि संमेलनामध्ये सहभागी होणार्‍या प्रतिनिधींसमोर, साहित्यिक, अभ्यासक आणि नामवंत व्यक्तींसमोर प्रदर्शित होणार आहेत. या कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने नामवंत चित्रकार, शिल्पकार यांचाही अनुभव नाशिकमधील नवोदित कलाकारांना होणार असून शक्य झाल्यास त्यांच्या समवेत प्रात्यक्षिक अथवा संवादाचा कार्यक्रमही आयोजित करण्याची कल्पना आहे.

या प्रदर्शनाच्या दृष्टीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून त्याचे समन्वयाचे कार्य लोकहितवादी मंडळाच्या कला विभागाच्या प्रमुख मुक्ता बालिगा करत आहेत. नाशिकमधील सर्व संबंधित कलाकारांनी आपल्या कलाकृती या प्रदर्शनासाठी उपलब्ध करून द्याव्यात असे आवाहन लोकहितवादी मंडळाचे कार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी आणि कार्यवाह सुभाष पाटील यांनी केले आहे. त्यासाठी संबंधितांनी कला विभाग प्रमुख मुक्ता बालिगा (दूरध्वनी क्रमांक 9822923144) यांच्याशी संपर्क साधावा.

कार्यालयात मास्क बंधनकारक

करोना रुग्णसंख्येसह प्रशासनाने जाहीर केलेल्या करोना नियमावलीमुळे संमेलनाच्या आयोजकांनी धसका घेतला आहे. त्यामुळे संमेलनाच्या कार्यालयात ‘नो मास्क- नो एन्ट्री’चा सूचना फलक लावण्यात आला आहे. मराठी साहित्य महामंडळाने कोरोना रुग्णसंख्या घटत असल्यामुळे नाशिकमध्ये संमेलन होणार असल्याची घोषणा केली होती. संमेलनाचे यजनमानपद असलेल्या लोकहितवादी मंडळाने कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी होईल, असा अंदाज घेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जागेची निश्चिती केली होती.

मात्र अभियांत्रिकी मैदान सोशल डिस्टस्निगंचे नियम, संमेलनाला येणारी गर्दी बघता अपुरे पडणार असल्याचे आयोजकांना लक्षात येताच त्यांनी गोएसोच्या क्रिकेट मैदानात संमेलन होणार असल्याचे सांगितले. कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, संमेलनाचे नियोजन करताना आधीपासूनच आयोजक करोना पार्श्वभूमीवर सर्व नियमावली पाळत नियोजन करत होते, आता नियमावलीत प्रशासनाने बदल केल्यामुळे आयोजकांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे संमेलनस्थळी येणार्‍या प्रत्येकाला आयोजकांनी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या