Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या...तेव्हा मला समाजसेवा करण्याचा सल्ला आप्पासाहेबांनी दिला-मुख्यमंत्री

…तेव्हा मला समाजसेवा करण्याचा सल्ला आप्पासाहेबांनी दिला-मुख्यमंत्री

मुंबई | Mumbai

यंदाचा २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना देण्यात आला आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा कार्यगौरव केला.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यावर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी त्यांना कशी मदत केली होती याची आठवण करून दिली. यावेळी ते म्हणाले की, “अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी, ज्ञानाच्या ज्योती घराघरात लावण्यासाठी या कुटुंबांचं मोठं योगदान आहे. उद्ध्वस्त होणारी लाखो कुटुंब, भरकटणाऱ्या कुटुंबांना दिशा देण्याचं काम आप्पासाहेबांनी, नानासाहेबांनी केलं. आता सचिनदादा त्यांचं कार्य पुढे नेत आहेत. या लाखो कुटुंबामध्ये माझंही एक कुटुंब होतं”, “माझ्या कुटुंबावर जेव्हा दुःखाचा डोंगर कोसळला, तेव्हा मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघेसाहेबांनी आधार दिला. तर, आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला या समजाची सेवा करण्यासाठी मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; म्हणाले, मला…

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘खरी श्रीमंती ही संस्कारांमध्ये आहे. ही श्रीमंती श्री परिवारामध्ये अनुभवायला मिळते. जगात श्रीमंत कोणी असाल, तर तुम्ही आहात. कारण नानासाहेब आणि आप्पासाहेब यांच्या विचारांची श्रीमंती घेऊन तुम्ही जीवन जगत आहात. मला वाटतं की तुमच्यापेक्षा श्रीमंत दुसरे कोणीच या ठिकाणी असू शकत नाही. ज्या प्रकारे आदरणीय आप्पासाहेबांनी निरूपणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक सकारात्मकता दिली आहे, ती कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज गौरव

दरम्यान, यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासमवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या इतर मंत्री आमदार आणि खासदार हे देखील उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या