Friday, April 26, 2024
HomeUncategorizedप्ले स्टोअरवरून अ‍ॅप झालं गायब

प्ले स्टोअरवरून अ‍ॅप झालं गायब

नवी दिल्ली – New Delhi

आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी पेटीएम आणि पेटीएम फर्स्ट गेम हे दोन्ही अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे. वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचे हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर दिसत नाही आहे. पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीच्या…

- Advertisement -

इतर अ‍ॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. गुगल प्ले स्टोअरने हे अ‍ॅप जुगारासंबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काढून टाकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुगलनं याआधी ऑनलाइन जुगाराला परवानगी देत नाही किंवा अशा अ‍ॅप्सना समर्थन देत नाही, असे सांगितले होते. त्यानंतर हे दोन्ही अ‍ॅप काढून टाकण्यात आले आहे.

गूगलचे उपाध्यक्ष सुझान फ्रे यांनी लिहिले आहे की आम्ही ऑनलाइन कसिनोला परवानगी देत नाही किंवा सट्टेबाजीची करणार्‍या अ‍ॅप्सना मान्यता देत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या