Thursday, April 25, 2024
Homeजळगावशिवसेनेच्या नगरसेवकाचा भर चौकात बॅनर लावून माफीनामा

शिवसेनेच्या नगरसेवकाचा भर चौकात बॅनर लावून माफीनामा

जळगाव jalgaon

घरकुल घोटाळ्याप्रकरणी (Gharkul scam case) नियमित जामीन मिळाल्यानंतर सुरेश जैन (Suresh Jain)यांची त्यांचे कट्टर विरोधी नगरसेवक (Opposition corporator) बंटी जोशी यांनी भर चौकात बॅनर लावून जाहीर माफी (Public apology) मागितली आहे.

- Advertisement -

आयुक्तपदी डॉ. गायकवाड की पवार : आज मॅटमध्ये सुनावणी

सॉरी दादा अशा आशयाचे फलक लावून माजी मंत्री  सुरेश जैन यांची जोशी यांनी जाहीर माफी मागितली आहे. भर चौकात बॅनर माफीचे बॅनर लावून माफि मागितल्याने हा विषय राज्यभरात चर्चेत आहे. 

माजी आमदार सुरेश जैन हे  मागील काळात राजकीय जीवनात सक्रिय असताना जळगाव महापालिकेमध्ये नगरसेवक अनंत जोशी हे सुरेश जैन यांचे कट्टर विरोधक होते. शहरातील विकास कामांबाबत टीका करण्याची एकही संधी बंटी जोशी सोडत नसत.

सुरेश दादांना भेटून नवीन ऊर्जा मिळाली : वैशालीताई सूर्यवंशी VISUAL STORY : स्व़. सुशांतसिंहच्या EX- गर्ल फ्रेंड चा हा लुक करेल तुम्हालाही घायाळ

मात्र, घरकुल घोटाळ्यात सुरेश जैन कारागृहात गेल्यानंतर  जळगाव शहराचा विकास तर दूरच, कधी नव्हती एवढी दुरवस्था झाल्याचं पाहायला मिळालं. सुरेश जैन यांच्या काळात त्यांनी केलेल्या विकास कामाकडे आपण दुर्लक्ष करून त्यांच्यावर केवळ विरोधाची भूमिका घेत आपण  केवळ अरोपच करत राहिलो होतो. आता त्याची खंत वाटत असल्याने आपण त्यांची जाहीर रित्या माफी मागत असल्याचं नगरसेवक बंटी जोशी यांनी म्हटलं आहे. 

अमृत 2.0 चे प्रकल्प व्यवस्थापन सेवा पुरविण्यासाठी मजीप्रा तयार

याबाबत नगसेवक बंटी जोशी यांनी सांगितलं आहे.  “बॅनर लावण्यामागचं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षात असताना किंवा मनसेचा नगरसेवक असताना मी सुरेश जैन आणि त्यांच्या खान्देश विकास आघाडीवर अनेकवेळा आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात अनेक आंदोलनं केली आहेत. शिवाय त्यांच्यावर अनेक वेळा जाहीर टीका देकील केली आहे. परंतु, आता त्यांचं काम किती मोठं आहे हे लक्षात आलंय. त्यामुळे आपण माफी मागितल्याचं जोशी यांनी सांगितलं. 

शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांना जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी नियमित जामीन मिळाल्यानंतर सुरेश जैन हे जळगाव दाखल झाले आहेत. यावेळी जळगाव मधील नेत्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा देखील केली. त्यामुळे पुन्हा सुरेश जैन राजकीय जीवनात सक्रिय होणार का याकडे लक्ष लागलं आहे. मात्र बंटी जोशी यांनी चक्क सॉरी दादा म्हणत सुरेश जैन यांची बॅनर द्वारे जाहीर माफी मागितली आहे.  

- Advertisment -

ताज्या बातम्या