Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रफक्त श्रीमंत व्यक्तींनाच न्याय मिळणार का?; नाईक कुटुंबीयांचा सवाल

फक्त श्रीमंत व्यक्तींनाच न्याय मिळणार का?; नाईक कुटुंबीयांचा सवाल

मुंबई | Mumbai

मनसुख हिरण मृत्यू प्रकरण अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजल्यानंतर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणदेखील पुन्हा चर्चेत आलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं,

- Advertisement -

असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधानसभेत केला होता. यानंतर फडणवीसांनी सुप्रीम कोर्टाचा दाखला देत गृहमंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल केला आहे. याचदरम्यान वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अद्याप न्याय न मिळाल्याचे नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

पत्रकार परिषदेत बोलतांना नाईक कुटुंबीयांनी मनसुख हिरन प्रकरणाचा दाखला देत आम्हाला कसा न्याय मिळत नाही हे मांडले. एका व्यक्तीला दोन दिवसांमध्ये न्याय मिळतो. त्याच प्रमाणे केवळ संशयावरून पोलिस अधिकाऱ्याची बदलीही केली जाते. आणि आमच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. सुसाईड नोटमध्ये आरोपींची नावेही स्पष्टपणे नमूद केलेली आहेत. असे असतानाही हे प्रकरण घडले तेव्हा विधानसभा अशीच हादवून का सोडली नाही, असा सवाल नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

ठरलं! ममता बॅनर्जी नंदीग्राम येथून लढणार निवडणूक

तसेच, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मनसुख हिरेन प्रकरणात गुप्तचर यंत्रणांकडून सहजपणे CDR मिळतो. मग तशाच प्रकारे आम्हाला CDR का बरे मिळाला नाही?, असा थेट प्रश्न अन्वय नाईक यांच्या मुलीने विचारला आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ईमेल आणि सुसाईड नोट मिळाली होती. तसेच या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे तीन आरोपींची नावे ही आहेत. असे असतानाही आम्हाला न्याय का मिळाला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, अन्वय नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आमचे बिलकूल ऐकून घेतले नाही, आम्हाला दाद दिली नाही, असा थेट आरोप अन्वय नाईक यांच्या पत्नीने केला. आशियातील श्रीमंत व्यक्तीला ज्या वेगाने न्याय मिळतो तसाच न्याय आमच्यासारख्या सामान्य माणसांना मिळणार नाही का, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नीने उपस्थित केला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं, असा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी विधानसभेत केला. यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर देत, माझी खुशाल चौकशी करा, माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही असं म्हटलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या