Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedHappy birthday : अनुष्का शेट्टीने चित्रपटासाठी वाढवले होते 20 किलो वजन

Happy birthday : अनुष्का शेट्टीने चित्रपटासाठी वाढवले होते 20 किलो वजन

बॉलिवूड – Bollywood

अनुष्का शेट्टीची गणना दक्षिणेतील अशा कलाकारांमध्ये केली जाते जे त्यांच्या व्यक्तिरेखेच्या गरजेनुसार स्वत:ला जुळवून घेतात, आणि तिचे चाहते तिने केलेल्या अभिनयाचेही खुप कौतुक करतात.

- Advertisement -

‘बाहुबली’ चित्रपटात देवसेनाची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवीली. या एकाच चित्रपटामुळे तिला आपल्या कारकिर्दीतील अशा उच्चांकापर्यंत पोहोचवले ज्याची बाकीच्या अभिनेत्री फक्त कल्पना करू शकतात. 7 नोव्हेंबर 1981 रोजी जन्मलेली अनुष्का आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करीत आहे.

एका चित्रपटासाठी, अनुष्काने जवळजवळ 20 किलोने वजन वाढवले ​​होते आणि नंतर पुन्हा शून्य होण्यासाठी परिश्रम घेतले.

2015 मध्ये २० किलो वजन वाढवून ‘त्या’ चित्रपटात अनुष्काने ‘स्वीटी’ नावाच्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. यात ती बरीच लठ्ठ दिसत होती.

नंतर तिने पुन्हा बाहुबली 2 साठी स्वत: ला फिट केले आणि एक सुंदर राजकुमारी बनली.

अनुष्काने 2005 मध्ये पुरी जगन्नाथच्या तेलगू चित्रपट सुपरपासून तिचा अभिनयाचा प्रवास सुरू केला होता. या चित्रपटात अनुष्काशिवाय नागार्जुन आणि आयशा टाकिया देखील मुख्य भूमिकेत होते.

अनुष्का ही दक्षिण फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री मानली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या