Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपुरातील नाट्यगृहाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार- आदिक

श्रीरामपुरातील नाट्यगृहाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार- आदिक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपुरातील नाट्यगृहाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी केले.

- Advertisement -

येथील नाट्य कलाकारांना राज्य स्तरावरील पुरस्कार तसेच प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाले म्हणून त्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक रवी पाटील, अ‍ॅड. प्रसन्ना बिंगी, विजय नगरकर, माणिक जाधव, नाना कर्डिले, अशोक कर्णे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले.

आदिक पुढे म्हणाल्या, की नाट्यगृह हे माझ्या वडिलांच्याच नावे आहे. ते सुरू होण्यासाठी माझी फार तळमळ आहे पण काही तांत्रिक अडचणी मुळे ते सुरू करता येत नाही.नाट्य गृहासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करून प्रश्न मार्गी लावू श्रीरामपूरच्या कलाकारांनी एक नाट्य प्रयोग करूनच त्या नाट्यगृहाचे उद्घाटन करू.

याप्रसंगी नाना कर्डिले, अशोक कर्णे, नगरसेवक रवी पाटील, अ‍ॅड. प्रसन्न बिंगी, संदीप कदम, शाम श्रीवास्तव, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात संदीप कदम, शाम श्रीवास्तव, रवी जावरे, कराटे चॅम्पियन वसीम शेख, यांचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नाट्यगृह लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी सर्व कलाकारांच्या वतीनं सूचना करण्यात आली त्यात अजय घोगरे, प्रकाश ढोणे, नवनाथ कर्डीले, नाना कर्डीले, अशोक कर्णे, दीप्तेश विसपुते, कासिम सय्यद, किरण उबाळे, आश्विनी परदेशी, मयूर वाकचौरे, गणेश करडे, अवधूत कुलकर्णी, विनोद वाघमारे, दिव्या गायकवाड, शर्वरी साळुंके, ऋतुजा धुमाळ, आदी कलाकारांनी मागणी केली होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय नगरकर यांनी केले सूत्रसंचालन अजय घोगरे यांनी केले. आभार नवनाथ कर्डिले यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या