Friday, April 26, 2024
Homeनगरशहरातील पाणीपुरवठ्यासाठी अखंडित वीजपुरवठा करावा- नगराध्यक्षा आदिक

शहरातील पाणीपुरवठ्यासाठी अखंडित वीजपुरवठा करावा- नगराध्यक्षा आदिक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहराला पाणीपुरवठा विभागास विद्युत पुरवठा करणार्‍या एक्सप्रेस फिडरचा वीजपुरवठा वारंवार तांत्रिक कारणांमुळे खंडीत होत आहे.

- Advertisement -

त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा येतो. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. यासाठी शहरासह परिसरातील पाणी पुरवठ्यासाठी अखंडित वीजपुरवठा करावा, अशा सूचना नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिल्या.

शहरासह पाणीपुरावठयाचा वारंवार खंडित होणारा वीज पुरवठ्याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांची बैठक नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी घेतली. यासाठी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता क्षिरसागर, उपकार्यकारी अभियंता अमित कांबळे, मिश्रा यांचे समवेत मुख्याधिकारी गणेश शिंदे, जेष्ठ नगरसेवक बाळासाहेब गांगड, राजेंद्र पवार, रईस जहागिरदार यांचे उपस्थितीत बैठक घेतली.

नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, आगामी येणारे सण होळी, रमजान, रामनवमी, उरूस आदीसाठी, शहरासह पाणीपुरावठयाची वीज खंडित करू नये.

यावेळी महावितरणच्या अधिकार्‍यांनी एक्सप्रेस फिडर वरील वीजपुरवठ्याबाबत उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत, असे सांगितले. तसेच शहरातील वीजपुरवठा देखिल वारंवार खंडित होणार नाही असे आश्वासन दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या