Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशअँटी बॅक्टेरियल मास्क बाजारात येणार

अँटी बॅक्टेरियल मास्क बाजारात येणार

हाँगकाँग – Hong Kong

कोरोनाला अटकाव होईल यासाठी शास्त्रज्ञांनी नवीन मास्क तयार केल्याचा दावा केला आहे. ‘ग्राफीन मास्क’ असे या मास्कचे नाव असून हा मास्क अँटी बॅक्टेरियल असून सूर्यप्रकाशात 10 मिनिटे ठेवल्यास तो स्वच्छ होतो.

- Advertisement -

एसीएस नॅनो या जर्नलमध्ये आलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीच्या दोन चाचण्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या दोन प्रजातींच्या नष्ट होण्यामध्ये या मास्कचा मोठा फायदा झाला आहे. या मास्कच्या निर्मितीसाठी खूप कमी खर्च येत असून याला नष्ट करणे देखील खूप सोपे आहे. यामुळे वापरून झालेले मास्क नष्ट करण्याचे टेन्शन कमी होणार असल्याचे देखील हाँगकाँग विद्यापीठातील या संशोधकाने सांगितले.

संशोधनामध्ये समोर आले आहे की, सध्या वापरात असलेले मेडिकल मास्क अँटी बॅक्टेरियल नसून हे मास्क फेकून दिल्यास अथवा ठेवल्यास याला कुणी स्पर्श केल्यास व्हायरस पसरण्याचा धोका जास्त आहे. या संशोधनाचे मुख्य अभ्यासक डॉ.ये रुक्वान ग्राफीन हे त्यांच्या अँटी बॅक्टेरिया संबंधी संशोधनासाठी आणि अभ्यासासाठी ओळखले जातात.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात लेसर-प्रेरित असणारे मास्क ग्राफिन यांनी तयार करण्याचे काम आणि संशोधन सुरु केले होते. या संशोधनासाठी या टीमने मास्क टेस्ट करताना त्यांना हा मास्क 82 टक्के अँटी बॅक्टेरियल आढळला. सर्व मास्कमध्ये कायम कायम वापरल्या जाणाऱ्या कार्बन फायबर आणि वितळलेले फॅब्रिक्सचा या मास्कमध्ये खूप कमी प्रमाणात वापर करण्यात आला आहे. यामध्ये याचे प्रमाण केवळ 2 टक्के आणि 9 टक्के इतके आहे.

या संशोधनात असे दिसून आले की, या मस्कवर जमा होणारा व्हायरस हा 8 तासांनंतर मृत होतो. मात्र इतर मास्कमध्ये तो व्हायरस तसाच जिवंत राहतो. त्यामुळे अँटी बॅक्टेरिया साठी हा मास्क खूप उपयोगी असून इतर मास्कच्या तुलनेत व्हायरसचा सामना हा मास्क जास्त करत असून कोरोना व्हायरसच्या संकटात हा मास्क जास्त सुरक्षा पुरवणार ठरू शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या