Saturday, April 27, 2024
Homeनगरसहकारी संस्थांच्या वार्षिक सभा यंदाही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे

सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा यंदाही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाची दुसरी लाट सुरू असल्याने सामाजिक अंतर पाळण्याच्या दृष्टीने 50 पेक्षा अधिक गव्यक्ती एकत्र येण्यास बंदी असल्याने सन 2020-21 या वर्षासाठी राज्यातील 50 पेक्षा जास्त सदस्य संख्या असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सभा व्हीसी किंवा ओएव्हिएमव्दारे घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

- Advertisement -

गत माचमध्येही असेच आदेश देण्यात आले होते. यंदाही सभा घेण्याबाबत संभ्रम होता. पण आता सहकार खात्यानेच परिपत्रक जारी केल्याने हा प्रश्न सुटला आहे. नगर जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे महत्वाचे आहे. या निर्णयामुळे आता या संस्थांच्या सभा व्हीसी किंवा ओएव्हिएमव्दारे घ्याव्या लागणार आहेत.

वार्षिक सभा व्हीसी किंवा ओएव्हिएमव्दारे घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना – 1) जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवणार्‍या संसर्गजन्य आजारामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग व महसूल व वन विभागाने तसेच जिल्हा प्रशासन व स्थानिक प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून 50 पेक्षा कमी सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्था त्यांच्या सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाव्दारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेवू शकतील.

2) 50 पेक्षा जास्त सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी खालील कार्यप्रणालीचा अवलंब करून व्हीसी अथवा ओएव्हीएमव्दारे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करावे.

अ) संस्थेच्या प्रत्येक सभासदास वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक वेळ व ठिकाण याबाबतची माहिती किमान सात दिवस अगोदर एसएसएस/मेल/व्हॉट्स पव्दारे कळविण्याची व्यवस्था करण्यात यावी.

ब) वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटिस संस्थेच्या नोटिस बोर्ड/ संस्थेच्या शाखांची कार्यालये इत्यादी ठिकाणी लावण्यात यावी.

क) ज्या सभासदांचे ईमेल पत्ता किंवा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नसेल अशा सभासदांना बैठकित चर्चेसाठी असणार्‍या विषयाबाबतची माहिती सात दिवसात पत्राव्दारे पोहोच करण्याची जबाबदारी संबंधित सहकारी संस्थेची राहील.

ड) सर्व सहकारी संस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतच्या माहितीची जाहिरात संस्थेचे कार्यक्षेत्र विचारात घेवून, किमान एक स्थानिक वर्तमानपत्र/एक जिल्हा वर्तमानपत्र किंवा राज्य दर्जा असलेल्या मराठी किंवा इंग्रजी वर्तमानपत्रात घ्यावी.

वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी व्हीसी किंवा ओएव्हिएम यापैकी कोणत्या माध्यमाव्दारे घेण्यात येणार आहे.

इ) सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या व्हीसी किंवा ओएव्हिएमव्दारे घेण्यासाठी संबंधित सहकारी संस्थेने त्यांच्याकडे उपलब्ध असणार्‍या तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने अथवा तज्ञ व्यक्ती / एजन्सीची निवड करून त्यांच्यामार्फत सभेचे कामकाज पार पाडावे.

ई) सदर एजन्सीची निवड करताना मराठी सॉफ्टवेअर उपलब्ध असणार्‍या एजन्सीचा प्राधान्याने विचार करावा.

उ) वार्षिक सर्वसाधारण सभेचे अभिलेख प्रचलित तरतूदीनुसार जतन करून ठेवण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील.

ऊ) वरील मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करून संस्थांनी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची कार्यवाही तात्काळ करावी. उपरोक्त आदेशाचे पालन न करणार्‍या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या