Friday, April 26, 2024
Homeनगरराहुरी पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी; इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे

राहुरी पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी; इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे

राहुरी l प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राहुरी पोलिस स्टेशन इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याचे चिन्ह दिसत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक डाॅ. प्रतापराव दिघावकर यांनी आज (१८ फेब्रुवारी) पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणी दरम्यान पोलिस स्टेशनच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली.

सध्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांची पोलिस महासंचालक यांच्याकडून वार्षिक तपासणी सुरू आहे. त्यानूसार आज दुपारी राहुरी पोलिस ठाण्याची तपासणी करण्यात आली. पोलिस महासंचालक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी दप्तर तपासणी करून विविध गुन्ह्यातील मोटारसायकल व इतर वाहने असा मुद्देमाल न्यायालयीन कारवाई करून मालकाच्या ताब्यात देण्याच्या सूचना केल्या. नंतर पोलिस वसाहतीची तपासणी केली. यावेळी काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी संपूर्ण जागेची पाहणी केली आणि पोलिस ठाणे इमारत बाबत माहिती घेऊन सूचना केल्या. तसेच देवळाली प्रवरा येथील स्वतंत्र पोलिस ठाणे संदर्भात पुर्न प्रस्ताव पाठविण्या बाबत आदेश दिले. तसेच राहुरी पोलिस ठाण्याच्या कामकाज बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र पोलिस वसाहतीची अवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

याप्रसंगी अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डाॅ. दिपाली काळे, पोलिस उप अधिक्षक संदिप मिटके, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक गणेश शेळके, निलेशकुमार वाघ, निरज बोकिल, मधूकर शिंदे आदींसह मोठा फौजफाटा उपस्थित होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या